वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या चौघींची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 12:02 AM2019-08-13T00:02:15+5:302019-08-13T00:02:30+5:30
पूर्वेकडील एका हॉटेलजवळ जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या चार तरुणींची शनिवारी संध्याकाळच्या सुमारास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने सुटका केली असून याप्रकरणी दोघांना अटक केले आहे.
नालासोपारा : पूर्वेकडील एका हॉटेलजवळ जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या चार तरुणींची शनिवारी संध्याकाळच्या सुमारास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने सुटका केली असून याप्रकरणी दोघांना अटक केले आहे. तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संजना संजय पाटील (३८) आणि रामू बुद्दु सिंग (२५) हे दोघे एका अल्पवयीन मुलीसह ४ तरुणींना जबरदस्तीने वेश्या व्यसाय करण्यासाठी नालासोपारा पूर्वेकडील अग्रवाल फायर ब्रिगेड जवळील हरेकृष्ण हॉटेलमध्ये आणणार आहे. बनावट गिºहाईक पाठवून रंगेहाथ अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षेच्या पोलिसांनी छापा मारून चौघींची सुटका केली असून मुलींना आणणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडले आहे. आरोपी विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले म्हणून पिटा अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. तरुणींची सुटका करण्याची गेल्या आठवड्याभरातील ही तिसरी घटना आहे.