दगाफटका, मेसेजला रिप्लाय दिला अन् फसली!
By विलास गावंडे | Published: January 12, 2024 10:36 PM2024-01-12T22:36:13+5:302024-01-12T22:36:24+5:30
युवतीने नो असा रिप्लाय दिला. यानंतरही युवतीला वारंवार कॉल येत होते.
नेर (यवतमाळ) : मोबाइलवर आलेल्या मेसेजला रिप्लाय देणे तिच्या अंगलट आले. आपण फसलो गेल्याचे लक्षात येताच पोलिसात धाव घेतली. अखेर त्याच्यावर नेरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचे असे झाले की, सहा महिन्यांपूर्वी नेर तालुक्याच्या एका गावातील शेतमजूर कुटुंबातील १७ वर्षीय मुलीला मोबाइलवर मेसेज आला. मला कॉल कर असे त्यात सूचविले होते. युवतीने नो असा रिप्लाय दिला. यानंतरही युवतीला वारंवार कॉल येत होते.
एकदा तिने कॉल रिसिव्ह केला. यानंतर दोघांमध्ये संवाद वाढत गेला. फोनवरून चॅटिंग सुरू झाली. त्याने आपली ओळख देताना आपण महाराष्ट्र सुरक्षा दलात असल्याचे सांगितले. चांगली ओळख झाल्यानंतर तो गावातही येऊन भेटला. लग्न करण्याचे आमिष दाखविले. १० जानेवारी २०२४ रोजी त्याने तिला बाहेर बोलाविले. तेथून दुचाकीवर बसवून दारव्हा येथील बसस्थानकाजवळ असलेल्या लाॅजवर नेले. तेथे संबंध प्रस्थापित केले. तेथून कांरजा लाड येथे आणि सांयकाळी अमरावती येथे मित्राच्या रूमवर नेले. जॉबवर जायचे असल्याचे सांगून तो मुंबई येथे निघून गेला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने आईवडिलांना आपबिती सांगितली.
नेर पोलिसात तक्रार करण्यात आली. या प्रकरणी नेर पोलिसांनी अतुल बाबूसिंग राठोड (२५) रा. धूमका (अनसिंग) जि. वाशिम याच्याविरुध्द ३६६ (अ), ३७६, ४१७ तसेच ०४,०६,लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम २०१२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास ठाणेदार बाळासाहेब नाईक यांच्या मार्गदर्शनात केला जात आहे.