हिंदू देवी-देवतांवर अश्लील टिप्पणी करणाऱ्या युट्यूबर हिर खानला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 04:25 PM2020-08-26T16:25:33+5:302020-08-26T16:36:48+5:30

एसओजी आणि खुलदाबाद पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत युट्यूबर हिर खानला तिच्या घरातून अटक केली.

allahabad offensive comment against hindu gods and goddess on social media youtuber heer khan arrested in prayagraj | हिंदू देवी-देवतांवर अश्लील टिप्पणी करणाऱ्या युट्यूबर हिर खानला अटक

हिंदू देवी-देवतांवर अश्लील टिप्पणी करणाऱ्या युट्यूबर हिर खानला अटक

googlenewsNext
ठळक मुद्देयुट्यूबवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये हिरा खान हिने हिंदू देवी-देवतांवर अभद्र आणि अश्लील भाषेत टिप्पणी केली होती.

प्रयागराज : सोशल मीडियात हिंदू देव-देवतांवर अश्लील टिप्पणी करणाऱ्या युट्यूबर हिर खान हिला पोलिसांनी अटक केली आहे. प्रयागराज पोलिसांनी युट्यूबर हिरा खान हिच्याविरोधात खुलदाबाद पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी २४ तासांच्या आत तिला अटक केली.

एसओजी आणि खुलदाबाद पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत युट्यूबर हिर खानला तिच्या घरातून अटक केली. खुल्दाबाद पोलीस ठाण्यात तिची चौकशी सुरू आहे. युट्यूबवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये हिरा खान हिने हिंदू देवी-देवतांवर अभद्र आणि अश्लील भाषेत टिप्पणी केली होती. यानंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्या आणि तिच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. 

दरम्यान, वादग्रस्त व्हिडीओ अपलोड केल्यानतंर हिर खान पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी प्रयागराज येथील आपल्या नातेवाईकांकडे लपून बसली होती. मात्र, पोलिसांनी २४ तासांत तिचा शोध घेतला आणि अटक केली, असे प्रयागराजचे एसएसपी अभिषेक दीक्षित यांनी सांगितले.

आणखी बातम्या...

'सुशांत सिंह राजपूतवर विषप्रयोग?', भाजपा नेत्याचा खळबळजनक दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात शक्तिशाली नेते, अभिनेत्री कंगना राणौतकडून ट्विट

'मी कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?', तरुणानं थेट मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र     

धक्कादायक! Rail Yatri वेबसाइटवरून ७ लाख प्रवाशांचा डेटा लीक, डेबिट कार्ड-UPI चे होते डिटेल्स    

आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले; 30 सप्टेंबरपासून लागू होणार    

CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...    

स्वातंत्र्यानंतर १९ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली; यामध्ये १४ नेहरू-गांधी घराण्याबाहेरचे...    

Web Title: allahabad offensive comment against hindu gods and goddess on social media youtuber heer khan arrested in prayagraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.