भ्रष्टाचाराचे आरोप, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहांची एसीबीकडून 2 तास चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 11:35 AM2022-02-02T11:35:50+5:302022-02-02T11:36:26+5:30
पोलीस निरिक्षक अनुप डांगे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणात जबाब नोंदवण्यासाठी एसीबीकड़ून परमबीर सिंह यांना तिसऱ्यादा समन्स बजावत 2 फेब्रुवारी हजर राहण्यास सांगितले होते.
मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची दोन तास चौकशी करत एसीबीने त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. यादरम्यान परमबीर यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळल्याचे समजते आहे.
पोलीस निरिक्षक अनुप डांगे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणात जबाब नोंदवण्यासाठी एसीबीकड़ून परमबीर सिंह यांना तिसऱ्यादा समन्स बजावत 2 फेब्रुवारी हजर राहण्यास सांगितले होते. यापूर्वी १० आणि १८ जानेवारी रोजी समन्स बजावण्यात आले होते. मात्र, सुप्रीम कोर्टातील कामकाजामुळे ते मंगळवारी 1 तारखेला एसीबीसमोर हजर झाले. त्यानुसार, एसीबीने त्यांचा जबाब नोंदवला आहे. गरज पडल्यास त्यांना पुन्हा एसीबीकडून बोलावण्यात येऊ शकते अशीही माहिती एसीबीकडून देण्यात आली आहे.