आलोकनाथ यांच्या अटकपूर्व जामीनावरील निर्णय कोर्टाने २६ डिसेंबरपर्यंत ठेवला राखून
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 04:34 PM2018-12-24T16:34:29+5:302018-12-24T16:37:41+5:30
त्या अट्टल दारूड्या असून अमली पदार्थांच्या आहारी गेल्या आहेत असा दावाही त्यांनी केला होता. त्यानंतर आज दिंडोशी सत्र न्यायालयाने आलोकनाथ यांच्या अटकपूर्व जामीनावरील निर्णय २६ डिसेंबरपर्यंत राखून ठेवला आहे.
मुंबई - #MeToo चळवळीतून ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या लेखिका विनता नंदा यांचे सर्व आरोप काल्पनिक असल्याचा दावा आलोकनाथ यांचे वकील देवेंद्र घोबुरम यांनी मागील सुनावणीदरम्यान कोर्टात केला होता. अशा प्रकारे कोर्टासमोर त्यांनी विनता नंदा यांच्या चारित्र्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्या अट्टल दारूड्या असून अमली पदार्थांच्या आहारी गेल्या आहेत असा दावाही त्यांनी केला होता. त्यानंतर आज दिंडोशी सत्र न्यायालयाने आलोकनाथ यांच्या अटकपूर्व जामीनावरील निर्णय २६ डिसेंबरपर्यंत राखून ठेवला आहे.
विनता नंदा यांनी महिन्याभरापूर्वी आलोकनाथ यांच्यावर २० वर्षांपूर्वी बलात्कार केल्याचा आरोप लावला आणि ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कोर्टात खटला उभा राहिल्यानंतर विनता नंदा यांचे अनेक वैवाहिक पुरुषांशी संबंध होते असा आरोप आलोकनाथ यांच्या वतीने करण्यात आला. आलोकनाथ आणि त्यांच्या पत्नीमध्ये भांडण निर्माण करण्याच्या दृष्टीने विनता नंदांनी प्रयत्न केल्याचाही आरोप त्यांनी केला. त्याचप्रमाणे त्या अट्टल दारूड्या असून अमली पदार्थांच्या आहारी गेल्या आहेत असा युक्तवाद आलोकनाथ यांचे वकिल कोर्टासमोर ठेवत असताना विनता नंदा यांच्या वकीलांनी मात्र विनता नंदाचे चारित्र्यहनन करण्यात येत आहे असं म्हणत या आरोपांना तीव्र विरोध केला होता. त्यामुळे या खटल्याच्या निकालाकडे बॉलिवूड क्षेत्रासह सर्वांचे लक्ष लागले आहे.
Mumbai: Dindoshi Sessions Court reserves order for 26 December on anticipatory bail application filed by actor Alok Nath in writer Vinta Nanda rape case. (file pics) pic.twitter.com/w7wFD6kmPU
— ANI (@ANI) December 24, 2018