Amaravati Murder Case: अमरावती हत्याकांडात मोठा खुलासा; उमेशच्या हत्येत मित्राचा हात, अंत्यसंस्कारातही झाला सामील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 04:50 PM2022-07-03T16:50:59+5:302022-07-03T16:52:35+5:30

Amaravati Murder Case: नुपूर शर्माच्या समर्थनार्थ कथित पोस्ट शेअर केल्याप्रकरणी अमरावती येथील उमेश कोल्हे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. याप्रकरणी युसूफ खानसह सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Amaravati Murder Case: Big revelation in Amravati massacre; A friend involved in Umesh Kolhe's murder, 6 accused arrested | Amaravati Murder Case: अमरावती हत्याकांडात मोठा खुलासा; उमेशच्या हत्येत मित्राचा हात, अंत्यसंस्कारातही झाला सामील

Amaravati Murder Case: अमरावती हत्याकांडात मोठा खुलासा; उमेशच्या हत्येत मित्राचा हात, अंत्यसंस्कारातही झाला सामील

googlenewsNext

Amaravati Murder Case: नुपूर शर्माच्या समर्थनार्थ कथित पोस्ट शेअर केल्याप्रकरणी अमरावती येथील उमेश कोल्हे हत्याकांडातील मुख्य आरोपीसह आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. कोल्हे यांचा 6 आरोपींनी गळा चिरून खून केला होता. या हत्याकांडात एकापाठोपाठ एक मोठे खुलासे होत आहेत. आता मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, मृत उमेश कोल्हे याच्या हत्येत त्याचा जवळचा मित्र डॉ. युसूफ खान याचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.. 

अंत्यसंस्कारातही सहभागी झाला
उमेश कोल्हे यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार त्यांच्या गळ्यावर 5 इंच रुंद, 7 इंच लांब आणि 5 इंच खोल जखमा आढळून आल्या. चाकूने मेंदूच्या मज्जातंतूला इजा झाल्याचे अहवालात पुढे म्हटले आहे. यासोबतच श्वासोच्छवासाची नळी, अन्नाची नळी आणि डोळ्याच्या नसांनाही मोठी इजा झाली आहे. विशेष म्हणजे, कुणालाही संशय येऊ नये म्हणून आरोपी युसूफ उमेशच्या अंत्यसंस्कारात आला होता. 

व्हॅट्सअॅपवर शेअर केली पोस्ट
युसूफ खान हा ‘ब्लॅक फ्रीडम’ नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचा सदस्य आहे. या ग्रुपमध्ये उमेशने नुपूर शर्माला सपोर्ट करणारी पोस्ट फॉरवर्ड केली होती. त्यानंतर युसूफ खानने ती पोस्ट ‘रहबरिया ग्रुप’ला पाठवली. त्या ग्रुपमध्ये हत्याकांडातील मास्टरमाइंडही होता. कोल्हे यांची ती पोस्ट पाहून चिडलेल्या आरोपीने 16 जून रोजी साथीदारांसोबत बैठक घेतली आणि उमेशच्या हत्येचा कट रचला. यानंतर कोल्हे यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

एनजीओला पाकिस्तानी फंडिंग
एनआयएच्या एफआयआरमध्ये आरोप करण्यात आला आहे की, ही हत्या एका वर्गाला धमकावण्याचा प्रयत्न आहे. इरफान रायबर हेल्पलाइन नावाची एनजीओ चालवतो आणि जवळपास 21 लोक त्याच्याशी संबंधित असल्याचेही तपासात समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येतील इतर आरोपीही याच एनजीओशी संबंधित आहेत. या एनजीओला काही आखाती देश आणि पाकिस्तानमधून निधी मिळत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. 

मास्टरमाइंडसह सर्व 6 आरोपींना अटक
उमेशचा मुलगा संकेत कोल्हे याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मुदस्सीर अहमद उर्फ सोनू रजा वल्द शेख ईब्राहिम (22),  अब्दुल तौफिक उर्फ नानू शेख तसलीम (24), शाहरूख पठाण उर्फ बादशाह हिदायत खान (25), शोएब खान उर्फ भुऱ्या वल्द साबीर खान (22), अतिब रशीद वल्द आदील रशीद (22) आणि युसूफ खान बहादूर खान (44) यांना अटक केली आहे. या आरोपींना कोर्टात हजर केले असता त्यांना कोर्टाने 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

Web Title: Amaravati Murder Case: Big revelation in Amravati massacre; A friend involved in Umesh Kolhe's murder, 6 accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.