आंबेगाव हादरले! दोघांच्या भांडणात मध्यस्थी करायला गेलेल्याचा खून; गंभीर जखमीचा ८ दिवसांनी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 03:17 PM2022-05-28T15:17:28+5:302022-05-28T15:17:57+5:30
हिललाईन पोलिसांनी अभिमन्यू भाग्यवंत यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली. हिललाईन पोलीस ठाण्याचे वारिष्ट पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारिपुत्र यांनी या घटनेतील आरोपी अभिमन्यू भाग्यवंत याला अटक केली.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : हिललाईन पोलीस ठाणे हद्दीतील आंबेगाव मध्ये अभिमन्यू भाग्यवंत व गंगाराम भाग्यवंत यांच्यातील भांडणात मध्यस्थी करायला गेलेले काथोड भाग्यवंत यांना अभिमन्यू भाग्यवंत याने २० मे रोजी जबर मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या काथोड त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी मृत्यू झाला.
उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबेगावात एका शुल्लक कारणावरून २० मे रोजी सकाळी साडे अकरा वाजता एकमेकांचे भावबंध असलेले अभिमन्यू भाग्यवंत व गंगाराम भाग्यवंत यांच्यात भांडण सुरू होते. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी ५३ वर्षीय काथोड भाग्यवंत हे गेले होते. यावेळी मध्यस्थी करण्याचा राग अभिमन्यू भाग्यवंत यांला आल्याने, त्याने लाकडी दांडक्याने काथोड भाग्यवंत यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे गावात एकच खळबळ उडाली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या काथोड यांना सुरवातीला शहरातील मध्यवर्ती रुग्णालयात, त्यानंतर कळवा ठाणे रुग्णालय व ठेथुन सायन मुंबई येथे उपचारासाठी हलविण्यात आले. गेले सात दिवस उपचार सुरू असताना शुक्रवारी त्यांचा अखेर मृत्यू झाला.
हिललाईन पोलिसांनी अभिमन्यू भाग्यवंत यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली. हिललाईन पोलीस ठाण्याचे वारिष्ट पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारिपुत्र यांनी या घटनेतील आरोपी अभिमन्यू भाग्यवंत याला अटक केली. असुन न्यायालया समोर उभे करण्यात येणार आहे. अधिक तपास पोलिस करीत करीत आहेत