Video - "परत द्या..."; शिक्षकाने फोन घेतला, विद्यार्थिनीला राग आला; 'तिने' डोळ्यात मिरची स्प्रे मारला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 11:25 AM2023-05-09T11:25:12+5:302023-05-09T11:30:43+5:30
एका विद्यार्थिनीचा फोन शिक्षकाने घेतला त्यानंतर ती प्रचंड संतापली.
शाळा-कॉलेजमध्ये अनेकदा शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे फोन घेतले जातात. याचा विद्यार्थ्यांना नक्कीच राग येतो, मात्र लेक्चर संपल्यानंतर शिक्षक फोन विद्यार्थ्यांना परत करतात. याच दरम्यान अमेरिकेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विद्यार्थिनीचा फोन शिक्षकाने घेतला त्यानंतर ती प्रचंड संतापली. रागाच्या भरात विद्यार्थिनीने शिक्षकावर मिरचीचा स्प्रे मारला. ही घटना टेनेसीच्या नॅशविल जवळील एंटओक हायस्कूलमध्ये घडली आहे.
एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, घटनेनंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यासोबतच विद्यार्थिनीच्या या वागणुकीबाबत लोकांमध्ये नाराजी होती. व्हिडीओ Reddit वर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, विद्यार्थिनीने शिक्षकावर मिरचीचा स्प्रे फवारल्यानंतर ती वर्गातून बाहेर पडताना दिसत आहे. तिने वर्गाबाहेरही शिक्षकाचा पाठलाग केला आणि तिचा फोन परत मागितला.
Girl pepper sprays teacher because he took her phone pic.twitter.com/QPAz6c3l4G
— OnlyBangers.eth (@OnlyBangersEth) May 6, 2023
विद्यार्थिनी लेक्चर सुरू असताना फोन वापरत होती आणि गुगलवरून प्रश्नांची उत्तरं देत होती. यानंतर शिक्षकाने तिचा फोन घेतला. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जेव्हा तिने शिक्षकाकडून फोन परत घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा शिक्षक आपला हात काढून घेतो. यानंतर, विद्यार्थी पुन्हा शिक्षकावर मिरचीचा स्प्रे फवारते. त्यानंतर शिक्षक वेदनेने रडत जमिनीवर पडतो. याच दरम्यान विद्यार्थिनी ओरडत तिचा फोन परत मागत राहते.
Reddit वर व्हिडिओ पोस्ट करणार्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, याआधी त्याच शिक्षकाने दुसऱ्या विद्यार्थ्याचा फोन जप्त केल्यावर त्याला मारलं होतं. विद्यार्थ्याला कॉपी करताना पकडलं. युजरने सांगितले की, एंटिओक हायस्कूलमध्ये हा प्रकार सर्रास घडतो. या घटनेमुळे इंटरनेटवर लोकांमध्ये संताप निर्माण झाला. अनेक य़ुजर्सनी हा थेट हल्ला असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.