रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे मिळाली अमेरिकन दाम्पत्याची हरवलेली बॅग 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 10:08 PM2019-01-14T22:08:01+5:302019-01-14T22:09:58+5:30

पर्स बॅग त्यामधील रोख रक्कम 15 हजार रुपये व ऍप्पल कंपनीचा फोन (60 हजार रुपये किंमतीचा) असा 75 हजार रुपयांचा मुद्देमाल तपास करुन त्यांना त्यांच्या ताब्यात दिला.

American couple's lost bag due to train alert | रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे मिळाली अमेरिकन दाम्पत्याची हरवलेली बॅग 

रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे मिळाली अमेरिकन दाम्पत्याची हरवलेली बॅग 

googlenewsNext
ठळक मुद्देती बॅग एका सहप्रवासी घेऊन गेल्याचे लक्षात आले त्यांनी त्याचा शोध घेऊन त्यांना परत मिळवून दिली.रेल्वे पोलिसांचा प्रामाणिकपणा व तत्परता याचे सर्वांनी कौतुक केले .

मुंबई - रेल्वेपोलिसांच्या सतर्केमुळे मिळाली अमेरिकन दाम्पत्याची बॅग आज मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात गुजरातहून मुंबईला आलेले अमेरिकन दाम्पत्य दुपारी  कर्णावती एक्सप्रेसने मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात उतरून आपल्या मुलीकडे जाण्यासाठी स्टेशन बाहेर टॅक्सी पकडण्यासाठी गेले असता त्यांची पैसे व ऍप्पल कंपनीचा मोबाईल असलेली पर्स  विसरून राहिल्याचे लक्षात येता ते पुन्हा रेल्वे स्थानकात आले असता मर्चंट दाम्पत्य यांची पर्स चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्यांनी  मुंबई सेंट्रल स्थानकातील कार्यरत असलेले जीआरपी पोलीस हवालदार दत्ता वंजारी पोलीस शिपाई कोळी व कोठावळे यांनी सतर्कता दाखवत आणि सीसीटीव्ही फुटेजचा तपास करून ती बॅग एका सहप्रवासी घेऊन गेल्याचे लक्षात आले त्यांनी त्याचा शोध घेऊन त्यांना परत मिळवून दिली. पर्स बॅग त्यामधील रोख रक्कम 15 हजार रुपये व ऍप्पल कंपनीचा फोन (60 हजार रुपये किंमतीचा) असा 75 हजार रुपयांचा मुद्देमाल तपास करुन त्यांना त्यांच्या ताब्यात दिला. यावेळी त्या दाम्पत्याने पोलिसांचे खूप आभार मानले. रेल्वे पोलिसांचा प्रामाणिकपणा व तत्परता याचे सर्वांनी कौतुक केले .

Web Title: American couple's lost bag due to train alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.