तरूणींना मारून त्यांचं मांस बर्गरमध्ये टाकून विकायचा, खतरनाक होता हा सीरीअल किलर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 10:12 AM2022-10-11T10:12:03+5:302022-10-11T10:12:42+5:30

Serial Killer Story: इथे फास्ट फूड विकणाऱ्या एका व्यक्तीने नॉनव्हेज बर्गर तरूणींच्या मांसाची टिक्की बनवून टाकली होती. पण लोकांना याची कानोकान खबर नव्हती. पण जेव्हा सत्य समोर आलं तर सगळ्यांनाच धक्का बसला.

American serial killer who killed 13 call girl and sold human flesh burger | तरूणींना मारून त्यांचं मांस बर्गरमध्ये टाकून विकायचा, खतरनाक होता हा सीरीअल किलर

तरूणींना मारून त्यांचं मांस बर्गरमध्ये टाकून विकायचा, खतरनाक होता हा सीरीअल किलर

googlenewsNext

Serial Killer Story:  गुन्हे विश्वातील अनेक खतरनाक घटना आजकाल वाचायला मिळतात. यातील काही घटना अशा असतात ज्यात गुन्हेगाराचं क्रूरतेच्या सर्व सीमा पार करतात. अशीच एक घटना घडली होती. अमेरिकेच्या बाल्टीमोर शहरात. इथे फास्ट फूड विकणाऱ्या एका व्यक्तीने नॉनव्हेज बर्गर तरूणींच्या मांसाची टिक्की बनवून टाकली होती. पण लोकांना याची कानोकान खबर नव्हती. पण जेव्हा सत्य समोर आलं तर सगळ्यांनाच धक्का बसला. चला जाणून घेऊ ही व्यक्ती असं का करत होता आणि याचा खुलासा कसा झाला

90 च्या दशकातील कहाणी

ही घटना 90 च्या दशकातील आहे. अमेरिकेच्या बाल्टीमोर शहरात जोसफ रॉय मेथेनी उर्फ जो रोडवर बर्गर आणि सॅंडविच विकत होता. चांगल्या टेस्टमुळे त्याचं बर्गर आणि सॅंडविच पॉप्युलर होतं. शहरात तो फेमस झाला होता. लोक त्याला टेस्टचं सीक्रेट विचारत होते, पण तो काही सांगत नव्हता.

कसा झाला खुलासा

एकीकडे तो फेसम होत होता आणि दुसरीकडे शहरातून तरूणी गायब होऊ लागल्या होत्या. पण हे समजत नव्हतं की, तरूणी गायब कुठे होत आहेत. कारण कुणाचीही डेडबॉडी मिळत नव्हती आणि काही पुरावेही सापडत नव्हते. पोलिसही हैराण होते की, गायब झालेल्या तरूणींना कसं शोधायचं. दरम्यान एक दिवस एका तरूणीला एका बॉक्स दिसला, जेव्हा तिने बॉक्स उघडला तर त्यात तिला एक मानवी सापळा दिसला. पोलिसांना चौकशीतून समजलं की, हा सापळा गायब झालेल्या एका तरूणीचाच आहे. त्यानंतर आणखी एक बॉक्स सापडला. त्यातही सापळा होता. आता पोलिसांना हे क्लीअर झालं होतं की, तरूणींना मारलं जात आहे. 

दुकान जोरात चालू होतं

एकीकडे पोलीस तपास करत होते तर दुसरीकडे जो चं दुकान तूफान चालत होतं. जो बर्गर विकण्यासोबतच ट्रकही चालवत होता. त्याच्या ट्रकमध्ये चाकू, हतोडा, कुऱ्हाड नेहमीच राहत होती. याने तो तरूणींची हत्या करत होता. नंतर त्यांचं मांस काढून बर्गरमध्ये टाकत होता. जो च्या निशाण्यावर खासकरून शहरातील रेड लाइट एरियातील तरूणी राहत होत्या. तो कॉल गर्लला ट्रकमध्ये बोलवत होता. त्यांच्यावर अत्याचार करायचा आणि त्यांची हत्या करायचा. हत्येनंतर तो मृतदेहाचं मांस काढत होता.

पकडला कसा गेला

एका राती जो मेथेनीने रिटा नावाच्या एका कॉल गर्लला संपर्क केला होता. त्याने तिला ट्रकमध्ये बोलवलं. त्याने तिला ड्रग्स दिलं. त्यानंतर तिला एका बंद पडलेल्या फॅक्टरीमध्ये घेऊन गेला. रिटाला त्याचं वागणं अजब वाटलं. ती तिथून कशीतरी पळाली आणि थेट पोलीस स्टेशनमध्ये गेली. पोलीस रिटाला तिथेच घेऊन गेले. तिथे त्यांना जो सापडला नाही, पण काही पुरावे सापडले. पोलिसांनी मेथेनीला अटक केली. चौकशीतून समोर आलं की, त्याने 13 तरूणींची हत्या केली. मेथेनीने सांगितलं की, पुरावे मिटवण्यासाठी तो तरूणींचं मांस काढत होता.

काय होतं हत्येचं कारण

पोलिसांनी तपास केला तर समजलं की, जो मेथेनी सेनेत होता. पण त्याला ड्रग्सची सवय लागली होती. नंतर तो एका कॉल गर्लच्या प्रेमात पडला. तिच्यासोबत त्याने बरेच दिवस घालवले. त्यांना एक मुलगाही झाला. मेथेनीचं त्याच्या मुलावर खूप प्रेम होतं. एक दिवस तो घरी आला तेव्हा ना गर्लफ्रेंड दिसली ना मुलगा. त्याने दोघांचा खूप शोध घेतला. पण ते कुठेच सापडले नाहीत. त्याने दोन लोकांना गर्लफ्रेंड आणि मुलाबाबत विचारलं. त्यांनी त्याला योग्य माहिती दिली नाही म्हणून त्याने त्यांची हत्या केली. हत्येनंतर त्यांचे मृतदेह त्याने नदीत फेकले. हे करत असताना त्याला एका मासेमारी करणाऱ्या व्यक्तीने पाहिलं. त्याने त्याचीही हत्या केली. 

गर्लफ्रेंड नादात केली तरूणींची हत्या

पोलिसांच्या चौकशीत जो ने सांगितलं की, 3 हत्या केल्यावर पत्नीच्या दग्याचा बदला घेण्यासाठी त्याने कॉल गर्लना मारणं सुरू केलं. पोलिसांना पुरावे मिळू नये म्हणून तो त्यांचं मांस काढून बर्गरमध्ये टाकत होता. त्यानंतर त्या जन्मठेपेची शिक्षा झाली. पण नंतर त्याचा तुरूंगातच मृत्यू झाला.

Web Title: American serial killer who killed 13 call girl and sold human flesh burger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.