Gynecologist sexually abused patients : धक्कादायक! अमेरिकन युनिव्हर्सिटी डॉक्टरकडून ५०० पेक्षा अधिक महिलांचं लैंगिक शोषण; असा समोर आला विचित्र प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 07:25 PM2021-03-27T19:25:09+5:302021-03-27T19:36:14+5:30

American university gynecologist sexually abused patients : स्त्री रोग विशेषज्ञ डॉक्टर जॉर्ज टिंडल यांच्यावर रुग्णांचे लैंगिक शोषण तसंच शिव्या देण्याचा आरोप लावण्यात आला होता

American university gynecologist sexually abused patients now to pay damages of 8 thousand crores | Gynecologist sexually abused patients : धक्कादायक! अमेरिकन युनिव्हर्सिटी डॉक्टरकडून ५०० पेक्षा अधिक महिलांचं लैंगिक शोषण; असा समोर आला विचित्र प्रकार

Gynecologist sexually abused patients : धक्कादायक! अमेरिकन युनिव्हर्सिटी डॉक्टरकडून ५०० पेक्षा अधिक महिलांचं लैंगिक शोषण; असा समोर आला विचित्र प्रकार

Next

अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये अनेक महिलांवर लैंगिक शोषण करण्याचा आरोप डॉक्टरवर लावण्यात आला आहे. या प्रकरणाबाबत आता युनिव्हर्सिटी पीडित महिलांना  १.१ अरब डॉलर म्हणजेच ८  हजार कोटी रुपये देणार आहे. युनिव्हर्सिटीचे स्त्री रोग विशेषज्ञ डॉक्टर जॉर्ज टिंडल यांच्यावर रुग्णांचे लैंगिक शोषण तसंच शिव्या देण्याचा आरोप लावण्यात आला होता. तीन वेगवेगळ्या प्रकरणांसाठी कोर्टानं ही भरपाई घोषित केली आहे. 

युनिव्हर्सिटीनं हा प्रकार निंदनीय असल्याचं म्हणत डॉ. जॉर्ज टिंडल यांच्याविरुद्धच्या कारवाईला प्रोत्साहन दिलं आहे.  युनिव्हर्सिटीतील बोर्ड ऑफ ट्रस्ट्रीजचे अध्यक्ष रिक कारूसो यांनी सांगितले की, ''युनिव्हर्सिटी अशा गोष्टींची काळजी घेऊ शकली नाही. ज्या गोष्टी खूप महत्वाच्या होत्या. त्या प्रकरणामुळे प्रतिमेला खूप नुकसान पोहोचलं आहे.''

 भारीच! लॉटरी एजंट महिलेचा प्रमाणिकपणा; तिकिटाचे २०० रूपये देताच पठ्या जिंकला ६ कोटींचा जॅकपॉट

२०१८ नंतर ५०० महिलांनी युनिव्हर्सिटीविरुद्ध तक्रार दाखल केली असून सध्या  ही युनिव्हर्सिटी तक्रारींचे केंद्र बनलं आहे.  युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांकडून वेबसाईटवर ३.५ लाख विद्यार्थ्यांना मेल पाठवण्यात आले होते. २०१६ मध्ये अशा प्रकारची पहिली तक्रार नोंदवण्यात आली होती. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार या महिलेले लैंगिक शोषण करण्यात आले होते. त्यानंतर तपासाला सुरूवात झाली होती.

धक्कादायक! दारूच्या नशेत शिकवायचा अन् शिक्षा म्हणून मुलींना कपडे काढायला लावायचा शिक्षक

आतापर्यंत अशा अनेक केसेस समोर आल्या आहेत. ज्यात  स्त्री रोग तज्ज्ञांचे शोषण करण्यात आले आहे.  UAC च्या दाव्यानुसार  मागच्या काही वर्षात युनिव्हर्सिटीत अनेक धक्कादायक प्रकरणं समोर आली.   २०१८ चे प्रकरण दाबण्यासाठी २१.५ करोड़ डॉलर म्हणजेच  जवळपास १, ५५८  करोड़ रुपये रक्कम द्यावी लागली होती. तर दुसऱ्यांदा दिलेल्या किमतीचा खुलासा करण्यात आलेला नाही. 
 

Web Title: American university gynecologist sexually abused patients now to pay damages of 8 thousand crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.