१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 01:33 PM2024-10-05T13:33:33+5:302024-10-05T13:34:25+5:30

चंदन वर्मा नावाच्या व्यक्तीवर पती, पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांची हत्या केल्याचा आरोप आहे.

amethi murder case many secrets revealed in police inquiry whatsapp chat chocolates | १० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा

फोटो - ndtv.in

एकाच कुटुंबातील चार जणांच्या हत्येमुळे उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चंदन वर्मा नावाच्या व्यक्तीवर पती, पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांची हत्या केल्याचा आरोप आहे. नोएडाच्या टोल प्लाझावरुन पोलिसांनी त्याला पकडलं. हत्येमागे प्रेमप्रकरण असल्याचं म्हटलं जात आहे. शिक्षक सुनील कुमारची पत्नी आणि चंदन यांचं अफेअर होतं, ज्यामुळे त्याने संपूर्ण कुटुंबाची हत्या केली. आता या प्रकरणातील जे काही खुलासे झाले आहेत ते अत्यंत धक्कादायक आहेत.

शिक्षकाची मुलगी सृष्टी आणि लाडो यांच्या मृतदेहाजवळ प्रत्येकी १० रुपये किमतीचे चॉकलेट्स सापडले आहेत. गोळी झाडण्यापूर्वी आरोपीने त्यांना चॉकलेट दिल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र नंतर मुलींच्या पालकांशी काही कारणावरून वाद झाला आणि त्याने दोघांची आणि नंतर मुलांची हत्या केली.

व्हॉट्सॲप स्टेटस, चॅटमधून उघड झालं रहस्य

पोलीस तपासादरम्यान आरोपी चंदन वर्माचं व्हॉट्सॲप स्टेटसही समोर आलं आहे. हत्येपूर्वी त्याने एक विचित्र स्टेटस पोस्ट केला होता ज्यामध्ये त्याने लिहिलं होतं की, "आज ५ लोक मरणार, मी लवकरच दाखवेन." यासोबतच त्याच्या व्हॉट्सॲप चॅटमधून अनेक रहस्य उघड झाली आहेत. तो अनेकदा सुनीलच्या पत्नीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असे.

संपूर्ण कुटुंबाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला असून, त्यामध्ये आरोपीने शिक्षकावर तीन, त्याच्या पत्नीवर दोन आणि मुलींवर प्रत्येकी एक गोळी झाडल्याचं समोर आलं आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून काही गोष्टी जप्त केल्या आहेत.

मंदिरात जाऊन घेतलं देवाचं दर्शन

शिक्षकाच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या करण्यापूर्वी आरोपी चंदन वर्मा हा मंदिरात देवाचं दर्शन घेण्यासाठी गेला होता अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर तो चालत सुनील कुमारच्या घरी पोहोचला आणि त्याने कुटुंबातील चारही जणांवर एकामागून एक गोळ्या झाडल्या. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 
 

Web Title: amethi murder case many secrets revealed in police inquiry whatsapp chat chocolates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.