गायकवाड म्हणतो, ७ वर्षांत पहिल्यांदाच घेतली लाच! सेवापुस्तिका ताब्यात; पाच तास झाडाझडती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 06:54 AM2023-11-07T06:54:23+5:302023-11-07T06:54:38+5:30
गायकवाड सात वर्षांपूर्वी सहायक अभियंता म्हणून रुजू झाला. त्याच्या घराच्या झडतीत रोख सापडली नाही. सात वर्षांत पहिल्यांदाच लाच घेतली, असे तो म्हणतो.
अहमदनगर : खळबळ उडवून देणाऱ्या एक कोटीच्या लाचप्रकरणी एसीबीने सोमवारी नगर व धुळे एमआयडीसीत छापे मारत झाडाझडती घेतली. पथकाने लाचखोर अमित गायकवाड व गणेश वाघ (फरार) यांच्या सेवापुस्तिकांसह महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.
गायकवाड सात वर्षांपूर्वी सहायक अभियंता म्हणून रुजू झाला. त्याच्या घराच्या झडतीत रोख सापडली नाही. सात वर्षांत पहिल्यांदाच लाच घेतली, असे तो म्हणतो.
नगर, धुळे एमआयडीसी कार्यालयांवर छापे
तीन पथके मुख्य सूत्रधार उपअभियंता गणेश वाघ याचा शोध घेत आहेत. नगर व धुळे अशा दोन्ही कार्यालयांची तपासणी झाली. गायकवाडच्या नागापूर एमआयडीसी कार्यालयात पाच तास तपासणी सुरू होती.
गायकवाडला जामीन; वाघचा अटकपूर्वसाठी अर्ज
आरोपी अमित किशोर गायकवाड (रा. आनंदविहार, नागापूर) याला जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांनी सोमवारी जामीन मंजूर केला तसेच उपअभियंता वाघ यानेही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.