अमित शहा कोलकात्यात; सीबीआयची पश्चिम बंगालसह चार राज्यांत मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 02:25 PM2020-11-28T14:25:16+5:302020-11-28T14:26:51+5:30
CBI Raid : कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी दीड वर्षांपूर्वी शारदा चिटफंड घोटाळ्यात छापा टाकण्यासाठी सीबीआयचे टीम गेली होती. मात्र, त्यांना कोलकाता पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
नवी दिल्ली : देशाची सर्वोच्च तपाससंस्था सीबीआयने चार राज्यांत जवळपास ४५ ठिकाण्यांवर एकाचवेळी छापा मारला आहे. कोळसा माफिया, भ्रष्टाचाराविरोधात सीबीआयने हा छापा मारला असून पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, झारखंड आणि बिहारमध्ये खळबळ उडाली आहे. महत्वाचे म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहापश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असून काही महिन्यांत तिथे निवडणूक होऊ घातली आहे.
कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी दीड वर्षांपूर्वी शारदा चिटफंड घोटाळ्यात छापा टाकण्यासाठी सीबीआयचे टीम गेली होती. मात्र, त्यांना कोलकाता पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तेव्हा प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रात्रभर आंदोलन करत राज्यात सीबीआयला कारवाईसाठी परवानगी काढून घेतली होती. आता विधानसभा निवडणुका जवळ आल्याने पुन्हा एकदा बंगालमधील वातावरण तापण्याची शक्यता आहे.
CBI raids underway at a total of 45 locations in West Bengal, Uttar Pradesh, Jharkhand & Bihar over allegations of illegal trade and theft of coal.
— ANI (@ANI) November 28, 2020
Cases registered against officials of Eastern Coalfields Ltd, Railways, CISF and private persons. https://t.co/zWCWDr5BmI
ही कारवाई विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नसली तरीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोलकात्यामध्ये असल्याने महत्वाची आहे. ही कारवाई अन्य तीन राज्यांतही सुरु आहे. यामध्ये ईस्टर्न कोलफील्ड्स, रेल्वे, सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांवर छापे टाकण्यात आले आहेत. या अधिकाऱ्यांवर गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहेत.