अमितेशकुमार ३५ वे आयुक्त, नवीन पोलीस आयुक्तांनी स्वीकारला पदभार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 04:31 PM2020-09-04T16:31:43+5:302020-09-04T16:31:43+5:30

डॉ. उपाध्याय यांच्याकडून स्वीकारली सूत्रे 

Amitesh Kumar takes over as 35th Commissioner, New Commissioner of Police | अमितेशकुमार ३५ वे आयुक्त, नवीन पोलीस आयुक्तांनी स्वीकारला पदभार

अमितेशकुमार ३५ वे आयुक्त, नवीन पोलीस आयुक्तांनी स्वीकारला पदभार

googlenewsNext
ठळक मुद्दे आपल्या पदाची सूत्रे त्यांनी मावळते पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडून दुपारी १२ च्या सुमारास स्वीकारली.

नागपूर : शहराचे नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. नागपूरचे ते ३५ वे पोलीस आयुक्त ठरले आहेत.
१९९५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले  अमितेशकुमार २० ऑक्टोबर २००५ ते ६ जुलै २००७ असे दोन वर्षे नागपूरला परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. येथे कार्यरत असताना त्यांनी डी कंपनीकडून केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मॅच फिक्सिंगचा भंडाफोड केला होता. बिहार मधून नक्षलवाद्यांसाठी आंध्र प्रदेशात होणारी शस्त्राची तस्करीही त्यांनी उघड केली होती. एक धडाकेबाज अधिकारी म्हणून त्यांनी येथे आपली ओळख निर्माण केल्यानंतर त्यांनी अमरावती आणि औरंगाबाद मध्येही सेवा दिली.

दोन वर्षांपासून अमितेश कुमार राज्य गुप्तवार्ता विभागात सहआयुक्त म्हणून कार्यरत होते. बुधवारी त्यांची नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली. हे पद अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या श्रेणीचे आहे. त्यामुळे अमितेश कुमार यांना येथे नियुक्ती देतांना पदोन्नतीही देण्यात आली.

 
आपल्या पदाची सूत्रे त्यांनी मावळते पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडून दुपारी १२ च्या सुमारास स्वीकारली. त्यानंतर डॉक्टर उपाध्याय यांच्यासोबत शहरातील गुन्हेगारी तसेच काही बाबींवर औपचारिक चर्चा केली. त्यानंतर ते लगेच गृहमंत्र्यांनी बोलविलेल्या बैठकीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयात  गेले. आपल्या विशिष्ट कार्यशैलीमुळे अमितेश कुमार सध्या गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक या तिघांच्याही गुडबुक'मध्ये आहे, हे विशेष!

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

 

बापरे! ९० हजाराहून अधिक तरुणांनी २०१९ मध्ये केली आत्महत्या, पहा NCRB चा अहवाल

 

 

Web Title: Amitesh Kumar takes over as 35th Commissioner, New Commissioner of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.