साधूच्या वेशातील इसमाच्या खून प्रकरणातील संशयित अमजद अट्टल गुन्हेगार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 09:35 PM2019-12-18T21:35:43+5:302019-12-18T21:36:05+5:30

मडगाव पोलिसांनी खून प्रकरणात त्याला अटक केल्यानंतर आता मंगळुरु पोलिसही त्याला चौकशीसाठी ताब्यात घेणार आहेत.

Amjad Atal criminals suspected in the murder of Isma in the vest | साधूच्या वेशातील इसमाच्या खून प्रकरणातील संशयित अमजद अट्टल गुन्हेगार

साधूच्या वेशातील इसमाच्या खून प्रकरणातील संशयित अमजद अट्टल गुन्हेगार

Next

मडगाव: साधुच्या वेशातील एका इसमाच्या खून प्रकरणी गोव्यातील मडगाव पोलिसांनी मुसक्या आवळलेला अमजद खान उर्फ निग्रो (२१) हा अटटल गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले आहे. कर्नाटातील मंगळुरु येथील सुलिया पोलीस ठाण्यातील तुरुगांतून त्याने यापुर्वी पलायन केले होते. तेथील पोलीस त्याच्या मागावर असून, तो तेथे वॉंटेन्ड आहे. मडगाव पोलिसांनी खून प्रकरणात त्याला अटक केल्यानंतर आता मंगळुरु पोलिसही त्याला चौकशीसाठी ताब्यात घेणार आहे. सदया अमजद खून प्रकरणी मडगाव पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहे.

मागच्या मंगळवारी मंगळवारी रात्री मालभाट येथील यल्लम्मा घुमटीजवळ खुनाची एक घटना घडली होती.दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी तेथे साधुच्या वेशातील एक इसम मृतावस्थेत सापडला होता. मृतदेहाजवळ दारुची एक बाटलीही सापडली होती. खून म्हणून मडगाव पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले होते.सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी या खून प्रकरणाचा तपास सुरु केला असता, एका युवकाने मयताच्या डोके दगडाने चेपल्याने हा खून झाल्याचे आढळून आले होते. पोलिसांनी तपास चालू करुन मागच्या आठवडयाच्या शुक्रवारी रात्री संशयित अमजद याला पकडले होते. त्याने आपल्या गुन्हयाची कबुली दिली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

संशयिताला पैसे पाहिजे होते. पहाटे साडेचारच्या दरम्यान तो फिरत यल्लम्मा घुमटीजवळ पोहचला असता, तेथे त्याला साधुच्या वेशात एक इसम सापडला, त्याच्याकडे पैसे मागितले असता, त्याने नकार दिला. नंतर चिडून त्याने दगडाने त्याचे डोके चेपले व पैसे घेउन तो पळून गेला होता. संशयिताला व्हायटनर द्रव्य हुगंण्याचे व्यसन होते. व्यसानासाठी पैसे पाहिजे असल्याने त्याने खून केला होता. शुक्रवारी रात्री तो मडगावच्या कोकण रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर रेल्वेतून गावी जाण्यासाठी आला असता, एलआयबी पोलीस पथकाचे पोलीस गोरखनाथ गावस यांनी त्याला पकडले होते.

अमजद हा गोव्यातील मडगाव व वास्को येथील रेल्वे स्थानकावर रहात होता असेही तपासात उघड झाले आहे.दरम्यान या खून प्रकरणातील मयताची ओळख अजूनही पटू शकली नाही. मृतदेह गोवा वैदयकीय महाविदयालय इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे. मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पोलीस तपास चालू आहे.





 

 

Web Title: Amjad Atal criminals suspected in the murder of Isma in the vest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.