कीर्तनकाराला घातला साडेआठ लाखांचा गंडा, १३५ कोटींच्या आमिषापोटी भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 05:13 AM2019-06-26T05:13:48+5:302019-06-26T05:14:21+5:30

मोहापासून दूर रहावे असे प्रवचन देणाऱ्या किर्तनकारालाच १३५ कोटींचा मोह आवरला नाही अन्...

The amount of Rs. 8 lakhs spent on Keertankar | कीर्तनकाराला घातला साडेआठ लाखांचा गंडा, १३५ कोटींच्या आमिषापोटी भुर्दंड

कीर्तनकाराला घातला साडेआठ लाखांचा गंडा, १३५ कोटींच्या आमिषापोटी भुर्दंड

Next

सोलापूर : मोहापासून दूर रहावे असे प्रवचन देणाऱ्या किर्तनकारालाच १३५ कोटींचा मोह आवरला नाही अन् खासगी कंपन्याकडून पैसे मिळवून देण्याचे सांगणाºया भामट्यांनी महाराजांना आठ लाख ५0 हजार रूपयांना फसविले. वारंवार पाठपुरावा करुन तसेच पुणे वारी करून थकलेल्या महाराजांनी शेवटी पोलिसांत फिर्याद दिली.
पुण्यातील मंदार क्षीरसागर, रमेश पुणतांबेकर, किशोर शिंदे व सोलापूरचे गजानन कवठीकर, सुधाकर बिराजदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सुधाकर अनंत इंगळे महाराज (लक्ष्मी पेठ, सोलापूर) यांची श्री संत मुक्ताई सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्था आहे. त्यांच्या परिचयाचे सुधाकर बिराजदार हे आॅक्टोबर २0१७ मध्ये संस्थेच्या कार्यालयात आले होते. खासगी कंपन्यांकडून सीएसआर फंडातून निधी मिळवून देतो, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर इंगळे महाराज, संस्थेचे अध्यक्ष एकनाथ केसरे आणि दोघे-तिघे पुणे येथे गेले. तेथे सुधाकर बिराजदार यांनी किशोक शिंदे, वरमेश पुणतांबेकर यांची भेट घालून दिली. संस्थेची सर्व कागदपत्रे व्यवस्थित असतील तर तुम्हाला खासगी कंपनीकडून आॅनलाईन बँकिंगद्वारे १३५ कोटी मिळतील, असे संबंधितांनी सांगितले. गजानन कवठीकर नावाचा व्यक्ती ही मदत करणार असून, तुम्हाला मिळालेल्या रकमेपैकी १0 टक्के रक्कम आम्हाला द्यावी लागेल, असे या भामट्यांनी सांगितले.
गजानन कवठीकर याचा विश्वास संपादन करण्यासाठी अगोदर १0 लाख रूपये द्या, अशी मागणी आरोपींनी केली. मागणीनुसार १७ फेब्रुवारी २0१८ रोजी ५ लाख व १ लाख, २१ फेब्रुवारी रोजी एक लाख रूपये असे एकूण ७ लाख रूपये लोकमंगल को-आॅप. बँकेच्या धनादेशाद्वारे दिले.

धनादेश वटलाच नाही
२ मार्च २०१८ रोजी एक लाख व १३ मार्च रोजी ५0 हजार असे ८ लाख ५0 हजार आरोपींना देण्यात आले. पैसे दिल्यानंतर आॅनलाईन बँकिंगद्वारे मिळणाºया पैशांची विचारणा केल्यानंतर आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. रमेश पुततांबेकर यांनी आठ लाख ५0 हजार रूपयांचा धनादेश दिला मात्र तो वटला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे इंगळे महाराजांच्या लक्षात आले.

Web Title: The amount of Rs. 8 lakhs spent on Keertankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.