Amravati Crime | लज्जास्पद! अल्पवयीन मेव्हणीवर केली बळजबरी, लादले गर्भारपण

By प्रदीप भाकरे | Published: January 31, 2023 03:47 PM2023-01-31T15:47:35+5:302023-01-31T15:48:10+5:30

जावयाचे दुष्कृत्य, पिडितेसह बहिणीला जीवे मारण्याची धमकी

Amravati Crime | Shameful! Forced, forced pregnancy on minor sister-in-law | Amravati Crime | लज्जास्पद! अल्पवयीन मेव्हणीवर केली बळजबरी, लादले गर्भारपण

Amravati Crime | लज्जास्पद! अल्पवयीन मेव्हणीवर केली बळजबरी, लादले गर्भारपण

Next

अमरावती: आपल्याकडे कधी कोण काय करेल याचा काही नियम नाही. आधी फक्त म्हणीतच कधी तरी चेष्टेने ‘साली आधी घरवाली’ म्हटले जात होते. मात्र याच म्हणीचा अर्थ पूर्ण करण्याचा प्रयत्न चांदूरबाजार तालुक्यातील एका तरूणाने केला. त्याच्या पराक्रमाची त्या पंचक्रोशीत एकच चर्चा रंगली असून दोन्ही कुटुंबांना मात्र मान खाली घालण्याची वेळ आली. या जावयाच्या पराक्रमामुळे सासरचे हैराण झाले. याने चक्क अल्पवयीन मेव्हणीवर बळजबरी करत तिच्यावर गर्भारपण लादले.

२२ जुलै ते २० ऑगस्ट २०२२ या काळात त्याने अल्पवयीन मेव्हणीचे लैंगिक शोषण केले. त्यातून तिला गर्भधारणा झाली. या प्रकरणी ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी ३० जानेवारी रोजी दुपारी त्यांच्याच हद्दीत राहणाऱ्या ४० वर्षीय जावयाविरूध्द बलात्कार, पोस्को व ॲट्रासिटीअन्वये गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, १७ वर्षीय फिर्यादी मुलगी ही आरोपीची सख्खी मेव्हणी आहे. फिर्यादीची मोठी बहीण अर्थात आरोपीची पत्नी गर्भवती असल्याने घरकाम करण्याकरिता लहान बहिण यांच्या घरी आली होती. २२ जुलै २०२२ रोजी आरोपीने अल्पवयीन मेव्हणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने वेळोवेळी तिचे लैंगिक शोषण केले. घटनेची वाच्यता केल्यास बहिणीला घरातून हाकलून देईल, तुला व तुझ्या बहिणीला मारुन टाकेने, अशा प्रकारची धमकी दिली. भीतीपोटी पिडितीने ही बाब कोणालाही सांगितली नाही. यातील आरोपीचे गाव व घटनास्थळ हे चांदूरबाजार तालुक्यात व ब्राम्हणवाडा थडी पोलीस ठाण्याच्या हददीत येते.

असे फुटले बिंग- २० जानेवारी रोजी पोट दुखत असल्याने पिडिता ही आईसोबत खाजगी दवाखान्यात गेली. त्यावेळी तपासणीअंती ती गर्भवती असल्याचे निदान करण्यात आले. याप्रकरणी दुसऱ्याच दिवशी अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसांनी आरोपी जावयाविरूध्द त्यावेळी गुन्हा दाखल केला. तो ३० जानेवारी रोजी घटनास्थळ ज्या पोलिसांच्या हद्दीत येते, त्या ब्राम्हणवाडा थडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. त्या पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास आरंभला आहे.

Web Title: Amravati Crime | Shameful! Forced, forced pregnancy on minor sister-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.