अमृतपाल सिंहच्या पत्नीला अमृतसर विमानतळावर अटक, लंडन पळून जाण्याच्या होती तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 01:53 PM2023-04-20T13:53:01+5:302023-04-20T13:56:17+5:30
Amritpal Singh wife : ती लंडनला पळून जाण्याच्या तयारीत होती. पण विमानात बसण्याआधीच तिला ताब्यात घेण्यात आलं. तिची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.
अमृतपाल सिंह अजूनही फरार असून त्याच्या पत्नीला गुरूवारी अमृतसर विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. ती लंडनला पळून जाण्याच्या तयारीत होती. पण विमानात बसण्याआधीच तिला ताब्यात घेण्यात आलं. तिची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.
अमृतपाल सिंह याची पत्नी किरणदीप कौर विरोधात देशात कुठेच कोणतीही एफआयआर दाखल नाही. किरणदीप कौर यूकेमध्ये राहत असताना बब्बर खालसा इंटरनॅशनलची अॅक्टिव मेंबर असल्याच्या बाबीचे पंजाब पोलीस आणि केंद्रीय एजन्सीकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. तिला फक्त चौकशीसाठी रोखण्यात आलं आहे.
अजूनही फरार अमृतपाल सिंह
पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंह आणि त्याच्या साथीदारांविरोधात 18 मार्चला कारवाई केली होती. अमृतपाल 'वारिस पंजाब दे'संघटनेचा मुख्य आहे.
यादरम्यान पोलिसांनी त्याचे शेकडो साथीदार पकडले. पण अमृतपाल सिंह काही साथीदारांसोबत फरार होण्यात यशस्वी झाला. तेव्हापासून पोलीस त्याचा सतत शोध घेत आहेत. इतकंच नाही तर पोलीस त्याचा परिवार आणि जवळच्या लोकांची चौकशीही करत आहेत.
कोण आहे किरणदीप कौर?
अमृतपाल सिंह याने याच वर्षी फेब्रुवारीमध्ये यूकेची एनआरआय किरणदीप कौरसोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर किरणदीप कौर पंजाबमध्ये राहत होती. ती यादरम्यान अमृतपालचं गाव जल्लूपूर खेडामध्ये राहत होती. तर किरणदीप कौरच्या परिवाराची मूळं जालंधरमध्ये असल्याचं समजतं.
पंजाब पोलिसांनी काही दिवसांआधीच किरणदीप कौरची चौकशी केली होती. ही चौकशी अमृतपाल सिंह याला मिळणाऱ्या कथित विदेशी फंडबाबत होती. पोलिसांना चौकशी दरम्यान समजलं की, अमृतपाल याला 35 कोटी रूपये फडिंग मिळालं होतं. पुढील चौकशी पोलीस करत आहेत.