कल्याण कोळशेवाडी परिसरात गुन्हेगारी वाढत असल्याने महिलांमध्ये संतापाचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2023 06:30 PM2023-08-17T18:30:48+5:302023-08-17T18:35:01+5:30
पोलीस गुन्हेगारांना बेड्या न घालता चौका चौकात त्यांच्याबरोबर बसून चहा पीत असल्याने गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक नसल्याचा आरोप या महिलांनी केला आहे
कल्याण पूर्वेमध्ये एका १२ वर्षीय अल्पवयीन तरुणीची एका माथेफिरू तरुणाने चाकूने ७ ते ८ वार करत तिच्या आई समोर हत्या केल्याची घटना काल रात्री घडली असून याप्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर आरोपीने फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून ३०९ प्रमाणे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आरोपीवर दाखल केला आहे. मात्र अनेक निवेदन देऊन पोलीस त्या निवेदनाला केराची टोपली दाखवत असल्याचा आरोप करत कल्याण कोचडी परिसरातील इतर पक्षाच्या महिला व सर्वसामान्य महिलामध्ये पोलिसांच्या विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस गुन्हेगारांना बेड्या न घालता चौका चौकात त्यांच्याबरोबर बसून चहा पीत असल्याने गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक नसल्याचा आरोप या महिलांनी केला आहे .त्याचबरोबर मुख्यमंत्री चा ठाणे जिल्हा व खासदार श्रीकांत शिंदे यांचे मतदारसंघात हॉटस्पॉट झालेल्या कोळसेवाडी पोलीस स्टेशन अजून किती महिलांचे बळी घेतल्यानंतर जागे होणार असा प्रश्न करत गृह खाते व मुख्यमंत्री व खासदार यांनी या पोलिसांवर लक्ष देण्यासाठी पोलिसांची विशेष लक्ष पथक निर्माण करण्याची मागणी ही या महिला करत आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी आज कल्याण दोन तीन चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांना निवेदन देत परिसरामध्ये पोलिसांचा गस्त वाढवत 112 हेल्पलाइन नंबर याची जनजागृती करत संबंधित आरोपीची केस फास्टट्रॅक वर घेऊन त्याला कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.