डॉक्टर पतीला पत्नीचा प्रियकराच्या मदतीने भुलीचे इंजेक्शन देऊन ठार मारण्याचा प्रयत्न; नाशिकमधील प्रकार

By अझहर शेख | Published: September 25, 2022 04:19 PM2022-09-25T16:19:58+5:302022-09-25T17:00:31+5:30

याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता संशयित महिलेच्या विवाहबाह्य अनैतिक संबंधाची कुणकुण तिचे पती असलेले पिडित डॉक्टरला लागली होती.

An attempt was made to kill the husband with the help of his wife's lover in Nashik. | डॉक्टर पतीला पत्नीचा प्रियकराच्या मदतीने भुलीचे इंजेक्शन देऊन ठार मारण्याचा प्रयत्न; नाशिकमधील प्रकार

डॉक्टर पतीला पत्नीचा प्रियकराच्या मदतीने भुलीचे इंजेक्शन देऊन ठार मारण्याचा प्रयत्न; नाशिकमधील प्रकार

googlenewsNext

नाशिक: अनैतिक संबंधातून डॉक्टर पतीला पत्नीने आपल्या दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने रुग्णालयातील एका खोलीत चक्क भुलीचे इंजेक्शन टोचून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. हा प्रकार पिडित डॉक्टरच्या मुलाने म्हसरूळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर रविवारी (दि.२५) उघडकीस आला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, येथील एका खासगी रुग्णालयातील ४५वर्षीय पिडित डॉक्टरला त्याच्या ४०वर्षीय पत्नीने आपल्या जोडीदारासोबत मिळून संगनमताने रुग्णालयात बोलावून घेत तेथे वाद घातला. यावेळी दोघांनी मिळून डॉक्टरला रुग्णालयातील एका खोलीत डांबले. तेथे त्यांना भुलीच्या औषध इंजेक्शनद्वारे देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
डाॅक्टरच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित महिला व तिच्या प्रियकराविरुद्ध म्हसरुळ पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता संशयित महिलेच्या विवाहबाह्य अनैतिक संबंधाची कुणकुण तिचे पती असलेले पिडित डॉक्टरला लागली होती. यामुळे संशयित महिलेने आपल्या जोडीदाराच्या मदतीने त्यांना भुलीचे इंजेक्शन दिल्याचा अंदाज वर्तविण्यात अआला आहे. याप्रकरणी पोलिसांनी रविवारी उशीरापर्यंत दोघा संशयितांपैकी कोणालाही चौकशीसाठी ताब्यात घेतलेले नव्हते. याप्रकरणी अधिक तपास सहायक निरिक्षक अहिरे हे करीत आहेत.

Web Title: An attempt was made to kill the husband with the help of his wife's lover in Nashik.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.