घरी नेलं, बेशुद्ध केलं अन् तो व्हिडिओ काढला; त्यानंतर मुलीच्या शाळेतील मेलवर पाठवला, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 07:55 PM2022-12-14T19:55:10+5:302022-12-14T19:56:25+5:30
झारखंडमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना समोर आली आहे.
झारखंडमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी करमटाड हरला येथील रहिवासी तो व्हिडिओ एडिटिंगचे काम करतो. सदर आरोपीने पीडितेला आपल्या घरी बोलावले आणि त्यानंतर तिला नशेचे पदार्थ पाजून बेशुद्ध केले. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि व्हिडिओही बनवला. तरुणीने पोलिसांत तक्रार करताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
बायकोशी बोलू नको, तुला संपवून टाकीन; धमकी, झाडाझुडपात मृतदेह, संशयितही लपले जंगलात!
आरोपी पीडित मुलीला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दोन वर्षांपासून तिचे शारीरिक शोषण करत होता. मुलीने शारिरीक संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तिचा व्हिडिओ संबंधित मुलीच्या शाळेच्या ई-मेलवर पाठवला. त्यानंतर शाळेतील व्यवस्थापनाने पीडित मुलीच्या पालकांना माहिती दिली. सदर प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले आणि आरोपीला पोलिसांनी अटक करून कारागृहात पाठवले. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.
आईने सांगितले की, ३ डिसेंबर रोजी सेक्टर ४मध्ये असलेल्या मुलीच्या शाळेच्या व्यवस्थापनाकडून त्यांना मेलमध्ये एक अश्लील व्हिडिओ आल्याची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी मुलीकडून माहिती घेतली. तिने रडत रडत सांगितले की, आपोरीनी तिच्यासोबत बळजबरी केली आणि सेक्टर ९मधील त्याच्या निवासस्थानी नेले. त्यानंतर तिला अंमली पदार्थ पाजून बेशुद्ध केले, त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला आणि तिचा व्हिडिओ बनवला.
रागावून घराच्या बाहेर पडली, ढाब्यावर पोहचली; एक भाकरी मागितली अन् पुढे नको ते घडलं...!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी देत त्याने २०२० पासून अनेकवेळा पीडित मुलीसोबत शारिरीक संबंध ठेवले आणि तिला घरातून उचलून नेण्याची धमकीही दिली. हरला पोलिस स्टेशनने आरोपी जियाउल मुस्तफा अन्सारी याला कलम 376(3)/376(2)(n)417/420/385/506 आणि पॉस्को कायद्यानुसार अटक केली आहे आणि त्याची कारागृहात रवानगी केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"