ज्युनिअरला तरुणीचं चुंबन घेण्यास भाग पाडलं; कॉलेज रॅगिंग प्रकरणी सिनिअर्स ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 03:53 PM2022-11-19T15:53:28+5:302022-11-19T15:58:53+5:30
महाविद्यालयाने या घटनेत सहभागी असलेल्या १२ विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले आहे.
नवी दिल्ली- ओडिशामधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीचे बळजबरीने चुंबन घेतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन अल्पवयीन मुलांसह पाच विद्यार्थ्यांना लैंगिक छळासह अनेक आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले.
गंजम जिल्ह्यातील महाविद्यालयाने या घटनेत सहभागी असलेल्या १२ विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले आहे. तसेच ताब्यात घेतलेल्या पाच विद्यार्थ्यांवर रॅगिंगचा आरोप ठेवण्यात आला आहे आणि मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायदा आणि आयटी कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन मुलांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, सरकारी महाविद्यालयात एका अल्पवयीन मुलाने प्रवेश घेतला. विद्यालयाच्या पहिल्या वर्षातील या अल्पवयीन विद्यार्थ्याला त्याच्या सिनियर विद्यार्थ्यांनी भडकावले. तसेच, मैदानातील एका अल्पवयीन मुलीला चुंबन घेण्यास भाग पाडले. त्यातून या मुलाने मैदानात जबरदस्तीने चुंबन घेतले, असे व्हिडिओमध्ये दिसून आले आहे. तसेच सदर घटनेचा सोशल मीडियावर देखील संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, बेरहामपूरचे पोलीस अधीक्षक सरबन विवेक एम म्हणाले की, हे फक्त रॅगिंगचे प्रकरण नाही तर मुलीच्या लैंगिक छळाचे प्रकरण आहे. ओडिशाची ही घटना हैद्राबादच्या घटनेच्या आठवड्यानंतर आणि आयआयटी-खरगपूर येथील वसतिगृहाच्या खोलीत एक विद्यार्थी मृतावस्थेत आढळल्यानंतर एक महिन्यानंतर घडली. पोलिसांनी आयआयटी घटनेला आत्महत्येचे प्रकरण म्हटले होतं. मात्र न्यायालयाने हे रॅगिंगचे प्रकरण असू शकते, असं म्हटलं होतं.