प्रेयसीने न ऐकल्यानं संतापला; घरी जाऊन तिच्या डोक्यात गोळ्या झाडल्या अन् शेतात लपला, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 05:09 PM2022-12-16T17:09:09+5:302022-12-16T17:09:43+5:30
भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रेयसीने न ऐकल्यामुळे प्रियकराने घरात जाऊन तिची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील हरदोई गावात घडली आहे. सदर घटनेनंतर आरोपीने टेरेसवरुन उडी मारून शेताकडे धाव घेतली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
महिला तुरुंग अधिकारी कैद्याच्या प्रेमात; किसच्या बदल्यात..., अधिकारीही पडले बुचकळ्यात!
सदर घटनेनंतर स्थानिक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले आणि तपास केला. त्यानंतर आरोपीला पकडण्यात देखील पोलिसांना यश मिळाले. पोलिसांनी शेतात नाकाबंदी करून आरोपीला अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, प्रेयसीने माझे ऐकले नाही, या गोष्टीचा तो नाराज होता, त्याने रागाने तिची हत्या केली. हे प्रकरण प्रेमप्रकरणाचे असल्याचे एसपींनी सांगितले. आरोपीला अटक करण्यात आली आहे. सर्व मुद्दे तपासून पुढील कार्यवाही केली जाईल, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
आफताब पुरता अडकला; श्रद्धाच्या जंगलात सापडलेल्या हाडांनी भक्कम पुरावा दिला...!
मृत दीपमाला या गावातील पंचायत सहायक होत्या. मिळालेल्या माहितीनूसार, तिचे शेजारी उमेश कुशवाहासोबत अफेअर होते. दोघेही एकाच जातीचे होते. उमेश पानिपत येथे मजुरीचे काम करतो. शुक्रवारी दुपारी दीपमाला आपली वहिनी केतकीसोबत टेरेसवर बसली होती. घरातील इतर सदस्य बाहेर होते. त्याचवेळी उमेशने घरात घुसून टेरेसवर जाऊन दीपमालाच्या डोक्यात पिस्तुलाने गोळ्या झाडून खून केला. घटनेनंतर आरोपीने छतावरून उडी मारून शेताकडे धाव घेतली. या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"