ऊसतोड महिलेवर पोलिसांनी केला अत्याचार; धाराशिवमधील घटनेनं राज्यात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 11:10 AM2024-02-06T11:10:47+5:302024-02-06T11:18:48+5:30
प्रकाश आंबेडकरांच्या या आरोपामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी 'एक्स' (आधीचे ट्विटर)वर पोस्ट करत धाराशिवमध्ये एका ऊसतोड महिलेवर पोलिसांनी अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. प्रकाश आंबेडकरांच्या या आरोपामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
प्रकाश आंबेडकर पोस्ट करत म्हणाले की, काल भूम जि. धाराशिव येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. एका पारधी समाजाच्या महिलेवर २ पोलिसांनी अत्याचार केला. त्यातील १ आरोपी होमगार्ड, तर दुसरा पोलीस शिपाई आहे. पीडित महिला ऊसतोड मजूर असून ती तिच्या मुलांना भेटायला बार्शी येथे जात असताना बस स्टँडवर आरोपींनी पीडित आणि तिचा दिर थांबले असताना त्यांना 'चोर' असल्याच्या संशयावरून गाडीत बसवून नेले आणि पैशांची मागणी केली. पीडित महिलेने ऊसतोड मुकादमाकडून उसने पैसे घेऊन आरोपी पोलिसांच्या मोबाईलवर पैसे दिले. यानंतर पुन्हा आरोपी पोलिसाने महिलेला दमदाटी करून महिलेवर अत्याचार केला आणि पीडितेला धमकावले, असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.
सदर घटनेवरून राज्याच्या कायद्या आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे खुलेआम पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो, तर दुसरीकडे कायद्याचे रक्षकच भक्षक होतात. या सर्व प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तातडीने पीडित महिलेची भेट घेऊन त्यांना धीर दिला. 'वंचित'चे नेते अरुण जाधव यांनी हे प्रकरण लावून धरले, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. तसेच प्रशासन आणि सरकारच्या नाकर्तेपणाचा फटका सामान्य जनतेला बसतोय. गृहमंत्र्यांचे हे सपशेल अपयश आहे. आरोपींना कठोर शिक्षा केली जावी. राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न किती गंभीर होत चाललाय, हे स्पष्ट होतंय, असंही प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.
प्रकाश आंबेडकरांचं ट्विट-
काल भूम जि. उस्मानाबाद येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. एका पारधी समाजाच्या महिलेवर २ पोलिसांनी अत्याचार केलाय. त्यातील १ आरोपी होमगार्ड, तर दुसरा पोलीस शिपाई आहे.
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) February 5, 2024
पीडित महिला ऊसतोड मजूर असून ती तिच्या मुलांना भेटायला बार्शी येथे जात असतांना बस स्टँडवर आरोपींनी पीडित आणि तिचा…