तिकीट प्रवासाची तारीख बदलणे पडले १० लाखांना; पवईत ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

By गौरी टेंबकर | Published: March 3, 2023 12:41 PM2023-03-03T12:41:53+5:302023-03-03T12:42:13+5:30

हा फोन छापरा यांनी १५ मिनिटे चालू ठेवत समोरून काहीच प्रतिसाद नसल्याने नंतर कट केला.

An old man from Powai who went to change the flight date was cheated | तिकीट प्रवासाची तारीख बदलणे पडले १० लाखांना; पवईत ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

तिकीट प्रवासाची तारीख बदलणे पडले १० लाखांना; पवईत ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

googlenewsNext

मुंबई - विदेशात जाण्यासाठीच्या विमानाची तारीख बदलणे पवईतील एका वृद्धाला महागात पडले आहे. या त्यांच्या खात्यातून दहा लाखाहून अधिक रक्कम काढण्यात आल्यावर त्यांनी पवई पोलिसांकडे धाव घेतली आहे.

तक्रारदार हरवंद सिंग छापरा (७८) हे त्यांच्या पत्नीसह पवईत राहतात. त्यांना २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता ९८८३९००८५२ या क्रमांकावरून फोन आला. ज्याने स्वतःचे नाव राहुल असे सांगत तो टर्किश एअरलाइन चा एजंट असल्याची ओळख दिली. त्यानंतर त्याने छापरा यांना तुम्ही जी मुंबईहून युएसएला जाण्याची तिकीट बुक केली आहे त्याबाबत आपल्याला काही तक्रार आहे का अशी विचारणा केली. त्यावर छापरा यांनी हो म्हणत प्रवासाची तारीख बदलायची असल्याचे सांगितले.

ते ऐकल्यावर कॉलर ने त्यांना तारीख बदलायची असल्यास त्याची फी भरावी लागेल असे सांगत छापरा यांचा बँक अकाउंट नंबर आणि डेबिट कार्ड क्रमांक घेतला. त्यांना ५ हजार रुपये भरायला सांगत एअरलाइन्सचा मेसेज येईपर्यंत फोन चालू ठेवण्यास सांगितला. हा फोन छापरा यांनी १५ मिनिटे चालू ठेवत समोरून काहीच प्रतिसाद नसल्याने नंतर कट केला. त्यानंतर त्यांच्या खात्यातून एकूण १० लाख १५ हजार रुपये डेबिट झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर सदर इसम त्यांना सतत फोन करत होता मात्र त्यांनी तो उचलला नाही. आणि त्यांच्या बँकेत जाऊन खाते फ्रीज करून पोलीस ठाण्यात तक्रार केली.  

Web Title: An old man from Powai who went to change the flight date was cheated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.