लातुरात भरधाव ट्रकने एका वृद्धाला चिरडले!
By राजकुमार जोंधळे | Updated: November 27, 2023 23:43 IST2023-11-27T23:43:18+5:302023-11-27T23:43:37+5:30
भीषण अपघात : पाेलिसांनी घेतला ट्रक ताब्यात...

लातुरात भरधाव ट्रकने एका वृद्धाला चिरडले!
लातूर : शहरातील बाभळगाव नाका परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या एका ७० वर्षीय वृद्धाला भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना साेमवारी घडली. यामध्ये वृद्ध जागीच ठार झाला आहे. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, चाकूर तालुक्यातील अंबिका राेहिणा येथील रहिवासी अंतराम वैजा कांबळे (वय ७०) हे लातुरातील बाभळगाव नाका परिसरात साेमवारी रस्ता ओलांडत हाेते. दरम्यान, दहा टायरी मालवाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना चिरडले. या भीषण अपघातात अंतराम कांबळे यांचा मृत्यू झाला.
घटनास्थळी विवेकानंद चाैक पाेलिसांनी भेट देऊन पंचानामा केला असून, मृतदेह लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपघातातील ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे. तपास पाेलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाे.हे.काॅ. पांडुरंग काेकणे करत आहेत.