...अन् फेसबुक फ्रेंडनं महिलेला घातला थोडा थोडका नव्हे, तर ११ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 10:14 PM2020-07-21T22:14:31+5:302020-07-21T22:18:13+5:30
बोरिवली येथील एका 43 वर्षीय महिलेला 22 जुलै रोजी अचानक मार्क डेनिलसन नावाच्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आली.
फेसबुकवर आलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे बोरिवलीतील एका महिलेला महागात पडले आहे. सीमाशुल्क विभागातून (कस्टम) वस्तूची सोडवण्यासाठी या महिलेला तब्बल 11 लाख रुपयांना गंडा घातल्याची बाब समोर आली आहे. या महिलेने पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.
बोरिवली येथील एका 43 वर्षीय महिलेला 22 जुलै रोजी अचानक मार्क डेनिलसन नावाच्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. तिने ती स्वीकारली, त्यानंतर दोघांमध्ये ऑनलाइन चॅटिंग सुरू झाली. या महिलेने तिला चांगलं इंग्रजी येत नाही असंही सांगितले. मात्र, त्याने याची काही अडचण नाही म्हणून चॅट सुरू ठेवलं. काही दिवसांनी त्याने आपला नंबर देऊन ही चर्चा व्हॉट्सअॅपवर सुरु केली. या महिलेनेही त्याच्यावर विश्वास ठेवत अवांतर चॅट सुरु ठेवलं. त्यानंतर डेनिलसनने या महिलेला तो लग्न करण्यासाठी भारतात येणार आहे असं सांगितलं. त्यासाठी त्याने एक पार्सल भारतात पाठवले आहे, मात्र कस्टममध्ये अडकले आहे. अत्यंत मौल्यवान असे हे साहित्य असल्याची बतावणी त्याने केली. नंतर या महिलेला कस्टमधून हे साहित्य सोडवण्यास विनंती केली. या महिलेने डेनिलसनचे साहित्य सोडवण्यास होकार दिला. त्यानंतर सुनिता शर्मा नावाच्या महिलेने आपण दिल्लीत कस्टम अधिकारी असल्याचं सांगून त्या महिलेला फोन केला.
सुनिता शर्माने सुरुवातील 15 हजार रुपये भरण्यास सांगितले होते. 15 हजाराची रक्कम या महिलेने भरली. त्यानंतर या महिलेकडून वारंवार फोन येण्यास सुरुवात झाली. या महिलेने नंतर 75 हजार रुपये परदेशी चलन भारतीय चलनात बदलण्यासाठी भरण्यास सांगितले. त्यानंतर पैशांची मागणी वाढतच गेली. विमानाच्या लँडिंग चार्जेसाठी तिने तब्बल 2.2 लाख आणि 3.5 लाख कर म्हणून भरण्यास सांगितले. जेव्हा या महिलेनं ही रक्कम भरण्यास नकार दिला, तेव्हा सुनिता शर्माने तिच्या विरोधात पोलीस तक्रार करण्याची धमकी दिली. 13 जून रोजी ही महिलेनं 2.5 लाख बँकेत भरले, तरी देखील पार्सल नेमके कुठे आहे, याबद्दल कोणतीही माहिती समोर न आल्यामुळे तिच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. त्यानंतर तिने थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस तपासास सुरुवात झाली. या महिलेच्या मुलानेही या डेनिलसन आणि सुनिता शर्मा नावाच्या महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. डेनिलसनच्या नावाने तब्बल 34 फेक फेसबुक अकाउंट असल्याचे उघडकीस आले.
देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी बँकेचे खाते उघडून ही रक्कम वळवण्यात आली होती. कोल्हापूर, दिल्ली आणि आसाममध्ये या भामट्याने पैसे काढले असल्याचं बँक तपासात उघड झालं आहे. या भामट्या डेनिलसनने अनेक फेक फेसबुक अकाउंट उघडली आहे. यात त्याने रशियातील एका गायकाचा फोटो वापरला आहे. या महिलेच्या मुलाने या रशियातील गायकाला फेसबुकवर तुझ्या फोटोचा गैरवापर झाल्याची माहिती दिली. हे टोळकं श्रीमंत, नोकरी करणाऱ्या विवाहीत महिलांना हेरून त्यांच्याशी मैत्री करुन नंतर फसवणूक करणे, अशी त्यांची मोडस ऑपरेंडी असल्याचे तपासात समोर आले. माहिती टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मेट्रो सिटीत IS ची कमान महिलांच्या हाती; NIAचा मोठा खुलासा
Vikas Dubey Encounter : कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला समोर, झाला मोठा खुलासा
दहा रुपये, समोसा अन् घडली भयावह घटना; शाळकरी मुलाने गळफास लावून केली आत्महत्या
वेदनादायी! शेतात घुसली म्हणून सांडणीचे कुऱ्हाडीनं कापले पाय; तडफडत सोडला जीव
एल्गार परिषद : वरावरा राव यांच्या प्रकृतीचा अहवाल द्या
दुर्घटना टळली! पश्चिम रेल्वे मार्गावर एक्सप्रेस आणि ट्रकचा अपघात, जीवितहानी नाही
मामा भाच्याला गंडवले, डिलरशिप मिळवून देण्याच्या बहाण्याने तब्बल ८५ लाखांची फसवणूक