...अन् HDFC मॅनेजरनेच बँकेला लावला कोट्यवधीचा चुना; 'असा' अडकला जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 09:41 PM2021-03-12T21:41:16+5:302021-03-12T21:42:11+5:30

Farud Case : या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी यापूर्वीच ३ आरोपींना अटक केली आहे.

... and the HDFC manager himself planted crores of lime in the bank; 'As' is trapped | ...अन् HDFC मॅनेजरनेच बँकेला लावला कोट्यवधीचा चुना; 'असा' अडकला जाळ्यात

...अन् HDFC मॅनेजरनेच बँकेला लावला कोट्यवधीचा चुना; 'असा' अडकला जाळ्यात

googlenewsNext
ठळक मुद्दे आर्थिक गुन्हे शाखेचे डीसीपी मोहम्मद अली यांनी दिलेल्या माहितीनुसार एचडीएफसी बँकेकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे १४५ वैयक्तिक कर्ज आणि बँकेच्या ७८ क्रेडिट कार्ड सापडल्याची तक्रार मिळाली आहे.

नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांनीएचडीएफसीच्याबँक मॅनेजरला अटक केली. बनावट पगार स्लिप आणि बँक स्टेटमेंटच्या आधारे आरोपी मॅनेजरने शेकडो लोकांना 10 कोटींहून अधिक कर्ज दिले. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी यापूर्वीच ३ आरोपींना अटक केली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेचे डीसीपी मोहम्मद अली यांनी दिलेल्या माहितीनुसार एचडीएफसी बँकेकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे १४५ वैयक्तिक कर्ज आणि बँकेच्या ७८ क्रेडिट कार्ड सापडल्याची तक्रार मिळाली आहे. नंतर वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्ड देण्यात आले. यातून १० कोटींपेक्षा जास्त रुपयांना बँकेला चुना लावण्यात आला. ज्यांची खाती उघडली गेली आहेत अशा बर्‍याच लोकांनी स्वत: ला लिपिक किंवा शिक्षक म्हणून असल्याचे सांगितले आहे.


पोलिसांनी तपास सुरू केला असता ४ बँक अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात आले. यात राम आशिष, मनोज दुबे, विनोद कुमार आणि पिनाकी कुमार यांचा समावेश होता. पोलिसांनी एमसीडीच्या शाळा आणि विविध विभागांना पत्र लिहून खाते उघडणाऱ्यांची माहिती विचारली असता तेथून उत्तर आले की या नावाने तेथे कोणी नोकरी करत नाही. तपासादरम्यान, असे दिसून आले की, एचडीएफसीच्या विविध शाखांमध्ये काम करणारे काही कर्मचारी आणि अधिकारी यांनी बनावट पगाराच्या स्लिप्स, बँक स्टेटमेन्ट्स आणि लोकांचे आयडी एका षडयंत्रांतर्गत तयार केले.


बँकेच्या उणीवांचा फायदा घेऊन त्याने दहा कोटींपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वीच बँकेचे कर्मचारी राम आशिष, विनोद प्रसाद, तबरेज यांना अटक केली आहे. ८ मार्च रोजी पोलिसांनी या प्रकरणातील आणखी एक आरोपी संजीत सिंगलाही अटक केली होती. संजित २०१५ ते२०१७ पर्यंत दिल्लीत एचडीएफसी बँकेच्या स्वतंत्र शाखेत कार्यरत होता, सध्या तो गुरुग्राममधील एचडीएफसी बँकेत बँक मॅनेजर म्हणून नोकरी करत होता.

Web Title: ... and the HDFC manager himself planted crores of lime in the bank; 'As' is trapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.