...अन् 'त्याने' रागारागात पत्नीची सेक्स टेपच पोलिसांना दिली!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 10:23 AM2018-07-17T10:23:15+5:302018-07-17T10:23:38+5:30

पोलीस अधीक्षकाचे आपल्या पत्नीशी असलेले अवैध संबंध उघड करण्यासाठी पतीने त्या दोघांची सेक्स टेप पोलिसांना दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

... and 'he' gave wife's sex tape to Police! | ...अन् 'त्याने' रागारागात पत्नीची सेक्स टेपच पोलिसांना दिली!

...अन् 'त्याने' रागारागात पत्नीची सेक्स टेपच पोलिसांना दिली!

googlenewsNext

बंगळुरू - पोलीस अधीक्षकाचे आपल्या पत्नीशी असलेले अवैध संबंध उघड करण्यासाठी पतीने त्या दोघांची सेक्स टेप पोलिसांना दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या चित्रफितीमध्ये संबंधिक पोलिस अधिकारी आणि सदर व्यक्तीची पत्नी आक्षेपार्ह स्थितीत दिसत असून, या दोघांमध्ये अवैध संहंध असल्याचा हा पुरावा असल्याचा दावा या महिलेच्या पतीने केला आहे. मात्र सदर महिलेने आपल्यावरील आरोप फेटाळून लावताना पतीकडून आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. 

 बंगळुरूमध्ये या प्रकाराची चर्चा सुरू असून,  बंगळुरू ग्रामीणचे पोलिस अधीक्षक भीमाशंकर एस. गुलेड यांनी आपल्या पत्नीला त्यांच्यासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप एका व्यक्तीने केला. तसेच आपले आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावा म्हणून त्याने एक चित्रफित जारी केली आहे. तसेच या पोलिस अधिकाऱ्याकडून आपल्याला  व  आपल्या पत्नीला जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा आरोपही त्याने केला. हा तरुण कर्नाटकमधील दावणगेरे येथील रहिवासी असून, त्याने कोरामंगला पोलिस ठाण्यात संबंधित पोलीस अधीक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, सद्यस्थित पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला आहे. 

 या प्रकरणात आरोप करण्यात आलेले भीमाशंकर एस. गुलेड हे  2016 ते 2018 या काळात दावणगेरे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक होते. त्या शहरात संबंधित पती आणि पत्नीचा फोटो स्टुडिओ होता. एकदा पोलिस अधीक्षकांनी आरोप करणाऱ्या तरुणाच्या पत्नीला आपल्या जुळ्या मुलींच्या वाढदिवसाची फोटोग्राफी करण्यासाठी बोलावले. त्यानंतर सदर महिलेकडे आकर्षित झालेल्या पोलिस अधीक्षकांनी शारीरिक संबंधांसाठी तिच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली. मात्र सदर महिलेने आपल्या पतीने केलेला दावा फेटाळून लावला आहे. आपल्या पतीने खोटा व्हिडिओ तयार करून दाखवला असून, त्यातून आपल्याल बदनाम करण्याचा प्रयत्न त्याने केला आहे, असा दावा तिने केला आहे.   
 

Web Title: ... and 'he' gave wife's sex tape to Police!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.