आॅनर किलिंग : मुलगी- जावयाला पेटविले; फरार वडिलांना अखेर अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 06:41 IST2019-05-08T06:41:41+5:302019-05-08T06:41:55+5:30
आंतरजातीय विवाह केल्याने मुलगी व जावयाला पेटविल्याप्रकरणी मुलीचे वडील रामा रामफल भरतिया यांना पारनेर पोलिसांनी अटक केली आहे. घटनेत रुक्मिणी हिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह पती मंगेशच्या भावाने ताब्यात घेतला आहे.

आॅनर किलिंग : मुलगी- जावयाला पेटविले; फरार वडिलांना अखेर अटक
निघोज (जि. अहमदनगर) : आंतरजातीय विवाह केल्याने मुलगी व जावयाला पेटविल्याप्रकरणी मुलीचे वडील रामा रामफल भरतिया यांना पारनेर पोलिसांनी अटक केली आहे. घटनेत रुक्मिणी हिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह पती मंगेशच्या भावाने ताब्यात घेतला आहे.
पारनेर तालुक्यातील निघोज येथे एक मे रोजी रुक्मिणी व मंगेश रणसिंग यांना तिचे वडील, काका यांनी पेटवून दिले. रविवारी रुक्मिणीचा मृत्यू झाला. मंगेश व रुक्मिणी यांचा जबाब ४ मे रोजी घेतला असून त्यात पती-पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला, ही बाब स्पष्ट झाली आहे. पोलिसांनी तिचा मामा घनशाम सरोजा व काका सुरेंद्रकुमार भरतिया यांना अटक केली आहे. निघोजमधील नवदाम्पत्यास जाळून मारण्याच्या प्रकरणास वेगळे वळण लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. घटना दुर्दैवी आहे. सखोल चौकशी केल्यास अनेक बाबी उघड होऊ शकतात, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.