सावत्र भावानं 27 हजारांसाठी 13 वर्षांच्या बहिणीला विकलं, पण पुढे जे घडलं ते 'भन्नाट' होतं!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 02:28 PM2020-07-22T14:28:40+5:302020-07-22T14:30:46+5:30
सावत्र भाऊ आणि त्याच्या पत्नीनं त्या मुलीला वेश्याव्यवसाय करणाऱ्या टोळीला विकलं...
विजयवाडा : एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंध्र प्रदेशमधीय प्रकासम जिल्ह्यातल्या सिंगारयाकोंडा शहरातील ही घटना आहे. सावत्र भावानं 27 हजारांसाठी त्याच्या 13 वर्षीय बहिणीला वेश्याव्यवसाय रॅकेट चावलणाऱ्या टोळीला विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पण, त्या मुलीनं त्यानंतर जे केलं ते भन्नाट होतं.
कोरोना ही अल्लाहनं दिलेली शिक्षा, त्यापासून वाचायचं असेल तर...; खासदाराचं अजब लॉजिक
18 जुलैला हा सर्व प्रकार घडला, परंतु त्या मुलीनं मोठ्या चतुराईनं 100 क्रमांक डायल करून पोलिसांना याबाबतची माहिती दिली. मुलीनं फोन केलेलं लोकेशन ट्रेस करताना पोलिसांनी त्या ठिकाणी गुप्त मोहीम राबवताना आरोपिंना पकडले. ''वडिलांच्या दुसऱ्या लग्नाच्या बायकोची ती मुलगी होती. पण, सावत्र आई आणि वडील यांच्यात नेहमी भांडण होतं असे. त्यामुळे 13 वर्षीय मुलगी नेल्लोरे जिल्ह्यातील कवाली येथे तिच्या सावत्र भावाकडे राहायला होती. 12 जुलैला सावत्र भाऊ आणि त्याची पत्नी त्या मुलीला घेऊन सिंगारयाकोंडा येथे गेले आणि वेश्याव्यवसाय करणाऱ्या टोळीला 27 हजारांत तिला विकलं,''अशी माहिती पोलिसांनी दिली.
त्या मुलीनं कसं तरी पोलिसांना फोन करून मदत मागितली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या मुलीला वाचवले. लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण ( POSCO) कायदा, 2012 आणि Immoral Traffic (Prevention) कायद्यांतर्गत कंदुकूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला आहे. ज्या घरात वेश्याव्यवसाय चालवला जायचा, त्या घर मालकालाही पोलिसांनी अटक केली आहे. शिवाय त्या मुलीचा भाऊ आणि त्याची पत्नीही पोलिसांच्या ताब्यात आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
IPL 2020चे स्थळ ठरले अन् आता तारीख, वेळही निश्चित झाली?; जाणून घ्या सर्व माहिती!
जगप्रसिद्ध मल्ल सादिक पंजाबी यांचे पाकिस्तानात निधन
ग्राऊंडस्टाफच्या मदतीसाठी पुढे आला 'सचिन'; करतोय राशनचं वाटप!
IPL 2020 पूर्वी टीम इंडिया 'या' देशाविरुद्ध ट्वेंटी-20 मालिका खेळणार? BCCIवर वाढता दबाव
विराट कोहलीचा RCB जिंकू शकतो IPL 2020; भारताच्या माजी क्रिकेटपटूनं सांगितलं 'भारी' लॉजिक!