'हे शोरुम नाही, चोराचे बाईक कलेक्शन आहे...', तरुणाने चोरल्या 100 गाड्या; पोलिसही चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 14:49 IST2025-02-28T14:48:42+5:302025-02-28T14:49:28+5:30
पोलिसांनी 100+ दुचाकी चोरणाऱ्या एका चोराला अटक केली आहे.

'हे शोरुम नाही, चोराचे बाईक कलेक्शन आहे...', तरुणाने चोरल्या 100 गाड्या; पोलिसही चक्रावले
Bike Theft :आंध्र प्रदेशपोलिसांनी दुचाकी चोरीची अशी घटना उघडकीस आणली आहे, जी ऐकून तुम्हालाही मोठा धक्का बसेल. पोलिसांनी एका चोरट्याला पकडले असून, त्याने तीन वर्षात 100 दुचाकी चोरल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, आरोपी दररोज संध्याकाळी बसने बंगळुरुला जायचा अन् केआर पुरम, टिन फॅक्टरी, महादेवपुरा या निवासी भागातून दुचाकी चोरायचा.
विविध शहरांतून दुचाकी चोरल्या
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने बंगळुरू, तिरुपती, चित्तूरसह अनेक ठिकाणाहून दुचाकी चोरल्या आहेत. आरोपी महागड्या दुचाकींना टार्गेट करुन चोरायचे आणि नंतर आंध्र प्रदेशात 15-20 हजार रुपयांना विकायचा. यातून मिळालेल्या पैशातून तो ऐश करायचा. याशिवाय आरोपीने केआर पुरम पोलीस स्टेशन हद्दीतदेखील 25 दुचाकी चोरल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपीकडून 20 रॉयल एनफिल्ड, 30 पल्सर, 40 ॲक्सिस आणि इतर वाहने जप्त केली आहेत.
Krishnarajapura police station has arrested 1 interstate accused from Andhrapradesh in crime number 98/2025 and recovered 100 bikes. During the investigation we have detected 23 cases of KR Pura 30 other cases of different police stations. pic.twitter.com/S8ylPDZPT5
— ಕೆ ಆರ್ ಪುರ ಪೊಲೀಸ ಠಾಣೆ KR pura Police Station (@krpurambcpps) February 28, 2025
जप्त केलेल्या वाहनांची किंमत
जप्त केलेल्या वाहनांची किंमत सुमारे 1.45 कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीविरुद्ध केआर पुरम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे दुचाकी चोरीच्या अनेक तक्रारी आल्या होत्या, त्यानंतर त्यांनी परिसरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली. बऱ्याच प्रयत्नांनंतर चोरट्याला पकडण्यात आले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
यूट्यूबवर व्हिडिओ पाहून बाईक चोरायला शिकला
यापूर्वीही असाच एक प्रकार समोर आला आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील एका तरुणाने यूट्यूबवर व्हिडीओ पाहून बाईक चोरायचे शिकला आणि शहरात चोरी करू लागला. व्यंकटेश्वरुलु असे या तरुणाचे नाव आहे. वेंकटेश्वरुलूने यूट्यूबवरून चावी हरवल्यास बाइक कशी सुरू करायची हे शिकून घेतले आणि नंतर चोरी करण्यासाठी त्याचा वापर केला. दुचाकी चोरल्यानंतर तो त्या OLX वर विकायचा आणि कमिशन मिळवायचा.