School teacher suspended : धक्कादायक! दारूच्या नशेत शिकवायचा अन् शिक्षा म्हणून मुलींना कपडे काढायला लावायचा शिक्षक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 06:17 PM2021-03-27T18:17:15+5:302021-03-27T18:29:51+5:30

School teacher suspended : मुलांनी प्रश्न विचारल्यानंतर शिव्या देताना दिसून आले. शाळेच्या मुलांना शिक्षा म्हणून कपडे काढण्याची  शिक्षा मिळायची.

Andhra school teacher suspended after video goes viral used to consumed alcohol in school campus | School teacher suspended : धक्कादायक! दारूच्या नशेत शिकवायचा अन् शिक्षा म्हणून मुलींना कपडे काढायला लावायचा शिक्षक

School teacher suspended : धक्कादायक! दारूच्या नशेत शिकवायचा अन् शिक्षा म्हणून मुलींना कपडे काढायला लावायचा शिक्षक

Next

दारूच्या नशेत विद्यार्थ्याना शिकवणाऱ्या शिक्षकालाआंध्र प्रदेश सराकारनं निलंबित केलं आहे.  हा शिक्षक विद्यार्थ्यांना अपशब्द वापरायचा.  व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या शिक्षकाविरुद्ध राज्य सरकारानं कडक कारवाई केली आहे. एका विद्यार्थ्यानं दिलेल्या माहितीनुसार शिक्षा म्हणून हा शिक्षक मुलींना कपडेसुद्धा काढायला सांगायचा. समोर आलेल्या माहितीनुसार या शिक्षकाचे नाव कोटेश्वर राव कृष्णा असे आहे. कोटेश्वरराव  जिल्ह्यातील एका मंडळ शाळेत शिक्षत आहेत.

जन्मदात्या पित्यानेच केला मुलीवर अत्याचार

हा माणूस फक्त दारूच्या नशेत शाळेत यायचा तर विद्यार्थ्यांसमोरही दारू पीत असल्याचा आरोप लावण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोटेश्वर राव याचा  व्हिडीओ व्हायरल होत होता. या व्हिडीओत हा माणूस स्टाफरुममध्ये बसून जेवत होता. यावेळी त्या माणसाची दारूची बाटलीसुद्धा कॅमेरात स्पष्ट दिसून आली. मुलांनी प्रश्न विचारल्यानंतर शिव्या द्यायचे आणि शाळेच्या मुलांना शिक्षा म्हणून कपडे काढायला लावायचे. असा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होता. 

 भारीच! लॉटरी एजंट महिलेचा प्रमाणिकपणा; तिकिटाचे २०० रूपये देताच पठ्या जिंकला ६ कोटींचा जॅकपॉट

विद्यार्थ्यांनी सांगितले की, शाळेच्या बाथरूम आणि कपाटात हा माणूस दारूच्या बॉटल्स ठेवायचा. जसजसी नशा चढायची  हा माणूस जास्त त्रास ज द्यायचा. व्हायरल व्हिडीओ आणि इतर पुराव्यांच्या आधारे या शिक्षकाविरूद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून शिक्षकाच्या या वर्तनाचा विद्यार्थ्यांच्या मनावर वाईट परिणाम झाला आहे. आता यावर  शिक्षण अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.  

Web Title: Andhra school teacher suspended after video goes viral used to consumed alcohol in school campus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.