फ्लॅट विक्रीस मनाई केल्याचा राग; उल्हासनगरात दलालांचा वृद्धेवर जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 05:25 PM2021-10-23T17:25:34+5:302021-10-23T17:26:33+5:30

शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजता मधू गोलानी प्लॅटवर आल्यावर गणेश सुहानदा व रवी तलरेजा हे दोघे प्लॅटवर जाऊन विक्री बाबत बोलणी सुरू केली. तेंव्हा वृद्धेने प्लॅट विकण्यास नकार दिला. याचा राग येऊन त्यांनी वृद्धेला मारहाण करून धारदार शस्त्रांनी हल्ला केला.

Anger over flat sales ban; Brokers attack old woman in Ulhasnagar, file a case | फ्लॅट विक्रीस मनाई केल्याचा राग; उल्हासनगरात दलालांचा वृद्धेवर जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल

फ्लॅट विक्रीस मनाई केल्याचा राग; उल्हासनगरात दलालांचा वृद्धेवर जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल

Next

सदानंद नाईक -

उल्हासनगर - कॅम्प नं-४ कारा मोटर्स शेजारील अलंकार इमारतीच्या सहाव्या मजल्यावर एका ७२ वर्षाच्या वृद्धेनचा फ्लॅट आहे. हा फ्लॅट विकण्यासाठी वृद्धेने दलालांना नकार दिल्याच्या रागातून त्यांनी वृद्धेवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी झाली असून खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगर पूर्वेतील अलंकार इमारतीच्या सहाव्या मजल्यावर ७२ वर्षीय मधू गोलानी यांचा प्लॅट असून त्या कल्याण येथे मुलासोबत राहतात. त्यांनी काही दिवसांपूर्वी प्लॅट विक्रीस काढला होता. प्लॅट विक्री असल्याची माहिती गणेश सुहानदा व रवी तलरेजा या दलालांना मिळाल्यावर त्यांची वृद्धेसोबत प्लॅट विक्री बाबत बोलणी सुरू केली. शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजता मधू गोलानी प्लॅटवर आल्यावर गणेश सुहानदा व रवी तलरेजा हे दोघे प्लॅटवर जाऊन विक्री बाबत बोलणी सुरू केली. तेंव्हा वृद्धेने प्लॅट विकण्यास नकार दिला. याचा राग येऊन त्यांनी वृद्धेला मारहाण करून धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात वृद्धा मधू गोलानी या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गणेश सुहानदा व रवी तलरेजा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांपैकी एकाला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हेया थोरात यांनी दिली. क्षुल्लक कारणावरून वृद्धेवर हल्ला झाला असून त्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. पोलीस अधिक तपास करीत असून नागरिकांनी दलालांपासून सावध राहण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हेया थोरात यांनी केले आहे.

 

Web Title: Anger over flat sales ban; Brokers attack old woman in Ulhasnagar, file a case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.