पत्नीसोबतच्या भांडणात मध्यस्थी केल्याचा राग, पतीने शेजाऱ्याच्या घराला लावली आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 16:04 IST2019-04-30T16:03:57+5:302019-04-30T16:04:15+5:30
या प्रकरणी अशोक शर्मा याला पंतनगर पोलिसांनी अटक केली आहे.

पत्नीसोबतच्या भांडणात मध्यस्थी केल्याचा राग, पतीने शेजाऱ्याच्या घराला लावली आग
मुंबई - पत्नीसोबत झालेल्या वादात शेजाऱ्याने मध्यस्थी केली. त्यामुळे शेजाऱ्याच्या मध्यस्थीने राग अनावर झालेल्या पतीने शेजाऱ्याच्या घराला चक्क आग लावली. घाटकोपर येथील पंतनगर परिसरात ही घटना घडली. स्थानिकांनी तात्काळ आग विझवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या प्रकरणी अशोक शर्मा याला पंतनगर पोलिसांनीअटक केली आहे.