अभ्यास करत नाही म्हणून रागावले, १४ वर्षाच्या मुलाने वडिलांना घरात बंद करून जाळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 16:11 IST2025-02-19T16:10:58+5:302025-02-19T16:11:44+5:30
पैसे चोरतो, अभ्यास करत नाही म्हणून वडील रागावले. त्यामुळे रागावलेल्या मुलाने वडिलांना घरात बंद करून पेटून दिले.

अभ्यास करत नाही म्हणून रागावले, १४ वर्षाच्या मुलाने वडिलांना घरात बंद करून जाळले
ही बातमी वाचून तुम्हाला धक्का बसेल... मुलांना रागवायचं की नाही, असा प्रश्न पडेल. कारण एका १४ वर्षाच्या मुलाने स्वतःच्या वडिलांना घरात कोंडीन जिवंत जाळले. अभ्यासा न करण्यावरून आणि पैसे चोरल्याच्या कारणावरून वडिलांनी त्याला झापले होते. त्यानंतर रागाच्या भरात त्याने वडिलांनाच संपवलं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ही घटना घडली आहे हरयाणामधील फरिदाबादमध्ये घडली आहे. १४ वर्षाच्या मुलाने आधी वडिलांना घरात कोंडले. त्यानंतर त्यांना पेटवले आणि छतावर गेला आणि उडी मारून पळून गेला.
बापासोबत वाद, मुलाने असं संपवलं?
फरिदाबादमधील नवीन नगरमध्ये ही घटना घडली आहे. आलम अन्सारी मयत व्यक्तीचे नाव आहे. आलम यांनी त्यांच्या १४ वर्षाच्या मुलाला झापले. पैसे चोरतो आणि अभ्यासकडे लक्ष देत नाही म्हणून त्यांनी झापले.
वडील रागावले म्हणून १४ वर्षाच्या मुलाला राग आला. घरात असतानाच त्याने आतून घराचा दरवाजा लावला. त्यानंतर नंतर त्यांना पेटवून दिले.
Faridabad, Haryana: A 14-year-old boy in Naveen Nagar locked his father in a room and set him on fire after being scolded for stealing money and neglecting studies. The incident occurred at AM. The father, 55-year-old Alam Ansari, died on the spot. Neighbors broke in but were… pic.twitter.com/baLUl5fsR8
— IANS (@ians_india) February 19, 2025
घरात आग लागल्याचे आजूबाजूच्या लोकांनी बघितले. ते धावून आले. त्यांनी आग विझवून अन्सारींना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, तोपर्यंत खूप उशिर जाला होता. दरम्यान, मुलगा घराच्या छतावर गेला. आणि खाली उतरून पळून गेला. नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.