भिवंडीत एएनआयची छापेमारी, पडघा बोरिवलीतून १५ जणांना घेतले ताब्यात
By नितीन पंडित | Published: December 9, 2023 04:17 PM2023-12-09T16:17:29+5:302023-12-09T16:17:53+5:30
एएनआयने ताब्यात घेतलेला पडघा बोरिवली येथील आरोपी साकीब नाचन हा यापूर्वी मुंबई बॉम्बस्फोट व इतर अतिरेकी कारवायांप्रकरणातील आरोपी असून तो अनेक वर्षे अटक होता.
भिवंडी: आयसिस संघटनेत सक्रिय असलेल्या संशयितांना राज्य व देशात विविध ठिकाणांहुन ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने भिवंडीत ठिकठिकाणी छापेमारी करून मुंबई नाशिक महामार्गावरील ग्रामीण भागातील पडघा बोरिवली येथून १५ जणांना ताब्यात घेतले आहे.
साकिब नाचन,हासिब मुल्ला,मुसाब मुल्ला,रेहान सुसे,फरहान सूसे,फिरोझ कुवार,आदिल खोत,मुखलिस नाचन,सैफ आतिक नाचन,याह्या खोत,राफिल नाचन,राझील नाचन,शकूब दिवकर,कासीफ बेलारे,मुंझिर केपि अशा १५ जणांना एनआयएने पडघा बोरिवलीतून अटक केली असून या सर्वांना दिल्ली येथे घेऊन जाणार असून एएनआय प्रकरणातील न्यायालयात या सर्वांना हजर करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
एएनआयने ताब्यात घेतलेला पडघा बोरिवली येथील आरोपी साकीब नाचन हा यापूर्वी मुंबई बॉम्बस्फोट व इतर अतिरेकी कारवायांप्रकरणातील आरोपी असून तो अनेक वर्षे अटक होता. त्याची आयसीस या अंतकवादी संघटनेशी संपर्क असल्याचा संशय एएनआयने व्यक्त करीत त्यास अटक केली आहे. पडघा बोरिवली बरोबरच भिवंडी शहरातील तीनबत्ती,इस्लामपुरा,शांतीनगर,निजामपुरा अशा चार ठिकाणी एएनआयने येथील काही व्यक्तींची चौकशी केली आहे. एएनआयने भिवंडी शहरासह ग्रामीण भागात केलेल्या या कारवाईमुळे शहर व ग्रामीण भागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
यापूर्वी एएनआयने पुणे आयसिस मॉड्युल प्रकरणात ऑगस्ट महिन्यात अटक केलेला सहावा आरोपी शामील नाचन हा शनिवारी अटक केलेला आरोपी साकीब नाचन याचा मुलगा आहे.त्यांनतर आता एएनआयने साकीब नाचनसह पंधरा जणांना अटक केली आहे.या पूर्वी पडघा बोरीवली येथून ३ जुलै रोजी झुल्फिकार बडोदावाला,शार्जिल शेख त्या पाठोपाठ ५ ऑगस्ट रोजी अकीब नाचण यास अटक केली होती.