Anil Deshmukh : ईडीसमोर अनिल देशमुख नाही राहिले हजर; वकिलांना पाठवून मागितली दुसरी वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 08:10 PM2021-06-26T20:10:12+5:302021-06-26T20:10:47+5:30
Anil Deshmukh : १०० कोटींच्या वसुली प्रकरणात केलेल्या आरोपाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात देशमुख यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते.
मुंबई - अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शनिवारी राज्याचे माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले. परंतु देशमुख ईडी कार्यालयात पोहोचू शकले नाहीत आणि वकिलांमार्फत कोणत्याही दुसऱ्या दिवशी हजर राहण्यासाठी वेळ मागितला आहे. १०० कोटींच्या वसुली प्रकरणात केलेल्या आरोपाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात देशमुख यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते.
ईडीच्या चौकशीसंदर्भात देशमुख यांचे वकील जयवंत पाटील म्हणाले की, “आम्ही ईडीला अर्ज करून चौकशीची अंमलबजावणी कोणत्या आधारे केली जात आहे, याची कागदपत्रे मागितली आहेत.'' आमच्याकडे तपासणीच्या संदर्भात कोणतीही माहिती नाही. म्हणून आम्ही चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नाही. आता ईडीला यावर निर्णय घ्यावा लागेल.
यापूर्वी, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांना समन्स बजावून शनिवारी ईडीसमोर हजर राहण्यास सांगितले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या नेत्याला बॅलार्ड इस्टेट भागातील ईडी कार्यालयात या प्रकरणातील चौकशी अअधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये (पीएमएलए) समन्स बजावण्यात आले होते आणि देशमुख यांना हजर होण्यास सकाळी 11 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती.
शुक्रवारी रात्री केंद्रीय एजन्सीने देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि वैयक्तिक सहाय्यक कुंदन शिंदे यांना अटक केली होती. यापूर्वी ईडीने मुंबई आणि नागपुरातील देशमुख, पालांडे आणि शिंदे यांच्या घरांवर छापा टाकला होता. छापा टाकल्यानंतर पालांडे आणि शिंदे यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आले. शनिवारी त्यांना दोघांना मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टात हजर केले असता १ जुलैपर्यंत त्यांना आदींची कोठडी सुनावली आहे, सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नियमित गुन्हा नोंदवून प्राथमिक चौकशी सुरू केली होती, त्यानंतर देशमुख व इतरांवर ईडीने गुन्हा दाखल केला होता.
Enforcement Directorate (ED) has summoned former Maharashtra Home Minister Anil Deshmukh today at its office for questioning, in connection with an alleged money laundering case: ED Sources pic.twitter.com/dVfnKjHcXo
— ANI (@ANI) June 26, 2021
Mumbai: Lawyers of ex-Maharashtra Home Minister Anil Deshmukh reach Enforcement Directorate office with an application, seeking some other date for his appearance before the agency.
— ANI (@ANI) June 26, 2021
He was summoned by ED today for questioning in connection with an alleged money laundering case. pic.twitter.com/4Wdtluz2oN