Anil Deshmukh: अनिल देशमुखांना दिलासा नाहीच! ईडी कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 01:58 PM2021-11-12T13:58:06+5:302021-11-12T13:58:27+5:30
Anil Deshmukh in ED's custody: माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देशमुख यांच्यावर मनी लॉंड्रिंग अंतर्गत गुन्हा दाखल केला.
मुंबई : मनी लाँड्रिंगप्रकरणी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या ईडी कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. देशमुख यांना 15 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी देण्यात आली आहे.
देशमुख हे १ नोव्हेंबर रोजी ईडीपुढे चौकशीला हजर राहिले. त्यांची १२ तास चौकशी करण्यात आली आणि १ नोव्हेंबरच्या मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली. माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देशमुख यांच्यावर मनी लॉंड्रिंग अंतर्गत गुन्हा दाखल केला. न्यायालयाने देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आता, मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्दबातल करत, देशमुख यांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावली होती.
Mumbai | Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh sent to Enforcement Directorate custody till 15th November, in connection with an alleged money laundering case
— ANI (@ANI) November 12, 2021
Visuals from earlier today pic.twitter.com/EuBdkt9hEm
हृषिकेशचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
देशमुख यांचा मुलगा हृषिकेश यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर १२ नोव्हेंबर रोजी सुनावणी आहे. हृषिकेश यांनी शुक्रवारी ईडीपुढे चौकशीस हजर राहणे टाळले. अनिल देशमुख यांना संशयित म्हणण्यात आले आणि १२ तास चौकशी केल्यानंतर आरोपी म्हणून अटक करण्यात आले. तसेच आपल्याबाबत होईल, अशी भीती जामीन अर्जात व्यक्त केली आहे.