अनिल परब ८ तासांच्या ईडी चौकशीनंतर म्हणाले, मी कोणत्याही व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर देणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 19:33 IST2021-09-28T19:32:53+5:302021-09-28T19:33:48+5:30
Anil Parab And ED :

अनिल परब ८ तासांच्या ईडी चौकशीनंतर म्हणाले, मी कोणत्याही व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर देणार नाही
मुंबई - राज्याचे परिवहन मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज मंगळवारी चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याबाबत दुसऱ्यांदा नोटीस बजावली होती. त्यानुसार परब ईडी कार्यालयात आज दुपारी १२ नंतर चौकशीसाठी पोहचले होते. त्यानंतर ८ तासांच्या ईडीच्या चौकशीनंतर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब ईडी कार्यालयातून सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास निघाले. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मी कोणत्याही व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर देणार नाही अशी प्रतिक्रिया दिली.
मुंबई - ८ तासांच्या चौकशीनंतर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब ईडी कार्यालयातून निघाले pic.twitter.com/9Wh31nQxJx
— Lokmat (@MiLOKMAT) September 28, 2021
अनिल परब यांनी सांगितले की, ईडीची सर्व प्रश्नांची उत्तरे दिली, चौकशीला सहकार्य केले, तपास यंत्रणेला जबाबदार आहे, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊ मात्र, कोणत्या व्यक्तीच्या आरोपाला प्रश्नाला उत्तर देणार नसल्याचे परब यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.
मुंबई : 'सर्व प्रश्नांची उत्तरे दिली, चौकशीला सहकार्य केले', ईडीच्या 8 तासांच्या चौकशीनंतर परिवहन मंत्री अनिल परबांची प्रतिक्रिया https://t.co/CbvSFUB0GJpic.twitter.com/ht0447P5uu
— Lokmat (@MiLOKMAT) September 28, 2021