Anil Parab: अनिल परबांनी ईडीकडे १४ दिवसांचा वेळ मागितला; दिले 'हे' कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 12:56 PM2021-08-31T12:56:16+5:302021-08-31T12:59:52+5:30
Anil Parab to ED: ईडीने बजावलेल्या नोटीसमध्ये केवळ ‘इन्व्हेस्टिगेशन पार्ट’ इतकेच नमूद करून मंगळवारी सकाळी ११ वाजता कार्यालयात हजर राहावे, असे नमूद केले होते.
राज्याचे परिवहन मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब (Anil Parab) यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याबाबत नोटीस बजावली होती. परंतू अनिल परब यांनी ईडीकडे (ED) १४ दिवसांची वेळ मागितली आहे. यासाठी त्यांनी मंत्री असल्याने काही ठरलेली कामे आहेत, यामुळे हजर राहू शकत नाही असे कळविले आहे. (Anil Parab says to ED, he couldn't appear before the agency today due to his pre-scheduled engagements.)
नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री परब यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू असताना राणे यांच्यावर कारवाई करण्याबाबत मोबाइल फोनवरून सूचना करत असल्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्याबद्दल भाजपाने त्यांच्यावर कारवाई आणि सीबीआय चौकशी करण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचे जाहीर केले होते.
In a communication to ED, Maharashtra Minister Anil Parab seeks 14 days time to appear before it in connection with a money laundering case; says he couldn't appear before the agency today due to his pre-scheduled engagements
— ANI (@ANI) August 31, 2021
(File photo) pic.twitter.com/0uUczYU8kU
ईडीने बजावलेल्या नोटीसमध्ये केवळ ‘इन्व्हेस्टिगेशन पार्ट’ इतकेच नमूद करून मंगळवारी सकाळी ११ वाजता कार्यालयात हजर राहावे, असे नमूद केले होते. त्यांच्याकडे १०० कोटी वसुली प्रकरण व सचिन वाझेने एनआयए कोठडीतून लिहिलेल्या पत्रात बीएमसी कॉन्ट्रॅक्टर्सकडून वसुली करण्याबाबत परब यांनी सूचना केल्याचे नमूद केले आहे. त्यानुषंगाने ही चौकशी केली जाणार असल्याचे समजते. नोटीसमध्ये काहीही नमूद नसल्याने त्याचे नेमके स्पष्टीकरण अनिल परब ईडीकडून मागवतील, असे सांगण्यात आले होते. परंतू त्यांनी कामातील व्यस्तता हे कारण दिले आहे.