पेनबोरीत पूर्ववैमनस्य उफाळून आले; तलवारेंना चाकू मारून जखमी केले

By सुनील काकडे | Published: June 21, 2024 09:38 PM2024-06-21T21:38:26+5:302024-06-21T21:38:39+5:30

आरोपींचे काही दिवसांपूर्वी समाधान तलवारे यांच्या भावासोबत भांडण झाले होते. त्याचा जाब विचारण्यासाठी ते गेले.

Animosity flared up in Penbori; Wounded by stabbing talware crime news | पेनबोरीत पूर्ववैमनस्य उफाळून आले; तलवारेंना चाकू मारून जखमी केले

पेनबोरीत पूर्ववैमनस्य उफाळून आले; तलवारेंना चाकू मारून जखमी केले

वाशिम : जिल्ह्यातील पेनबोरी येथे पूर्ववैमनस्यातून आरोपिंनी वाद घालत समाधान शांतीराम तलवारे (४०) यांच्यावर १९ जून रोजी सायंकाळच्या सुमारास चाकूहल्ला केला. याप्रकरणी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राजू सुलताने, विजय सुलताने (रा. पेनबोरी) या दोघांवर २० जून रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.

प्राप्त माहितीनुसार, आरोपींचे काही दिवसांपूर्वी समाधान तलवारे यांच्या भावासोबत भांडण झाले होते. त्याचा जाब विचारण्यासाठी ते गेले असता, आरोपिंनी शिविगाळ केली. तसेच राजू सुलताने याने छाती आणि पोट्यात बुक्या मारल्या. विजय सुलताने याने चावीच्या किचेनला असलेला चाकू काढून वार केला. त्यात समाधान तलवारे हे गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर अकोला येथील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. अशा फिर्यादीवरून पोलिसांनी नमूद दोन्ही आरोपींवर भादंविचे कलम ३२६, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
 

Web Title: Animosity flared up in Penbori; Wounded by stabbing talware crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.