Anis Khan Death: युवकाच्या हत्येचं गूढ वाढलं, पश्चिम बंगालमध्ये आंदोलन पेटलं; ‘तो’ पोलिसवाला कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 08:06 AM2022-02-23T08:06:36+5:302022-02-23T08:07:29+5:30
हे प्रकरण खाकी वर्दीवर प्रश्नचिन्ह उभं करणारं आहे. कुटुंबीयांना पोलिसांकडे धाव घेतली. आरोपी पोलिसाला अटक होईल असं घरच्यांना वाटलं. परंतु यात एक ट्विस्ट आला.
कोलकाता – जेव्हा कुणाचा खून झाला तर लोकं पोलिसांकडे जातात. परंतु पोलिसांच्या वर्दीतच खूनी असेल तर सर्व हैराण होतील. कोलकातामध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानासाठी एक विद्यार्थी मागील ५ महिन्यांपासून विद्यापीठ विरोधात आंदोलन करत होता. १९ फेब्रुवारीला रात्री त्याच विद्यार्थ्याच्या घरी ४ लोक अचानक घुसले. ज्यात एक पोलिसवाला होता. त्यानंतर या चौघांनी विद्यार्थ्याला घराच्या तिसऱ्या मजल्यावर नेले आणि त्याठिकाणाहून खाली फेकून दिले.
आता या विद्यार्थ्याच्या हत्येत सहभागी असणारा तो पोलिसवाला कोण? यावर कोलकातामध्ये खळबळ माजली आहे. कोलकाता पश्चिम येथून ५० किलोमीटर दूर हावडा येथे ही घटना घडली आहे. ज्यामुळे केवळ याच परिसरातच नव्हे तर राज्यात या प्रकरणाची चर्चा सुरु आहे. अर्ध्या रात्री ४ जण घरात घुसले आणि घरच्यांना अनीस खानबाबत विचारणा केली. मात्र उत्तर मिळण्यापूर्वीच ते घराच्या छतावर गेले. यात ४ जणांमध्ये १ पोलिसही होता.ज्याच्याकडे पिस्तुल होती. घरच्यांनी त्यांना विरोध केला परंतु ते कुणालाही न जुमानता थेट अनीसला पकडलं आणि बेदम मारहाण करत तिसऱ्या मजल्यावर घेऊन गेले. घरचे त्यांना रोखत होते पण मोठी हानी झाली. या चौघांनी अनीसला घरच्या तिसऱ्या मजल्यावर खाली फेकले. त्यात अनीसचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हे प्रकरण खाकी वर्दीवर प्रश्नचिन्ह उभं करणारं आहे. कुटुंबीयांना पोलिसांकडे धाव घेतली. आरोपी पोलिसाला अटक होईल असं घरच्यांना वाटलं. परंतु यात एक ट्विस्ट आला. जेव्हा घरचे आमता पोलीस ठाण्यात पोहचले तेव्हा त्यांना सांगण्यात आले की, त्यांच्या घरी कोण आलं होतं आणि अनीसला छतावरुन खाली कुणी फेकलं याची माहिती नाही. घरचे ज्यांना पोलीस समजत होते ते खरेच पोलीस होते का? असा सवाल उभा राहिला. त्यामुळे घरच्यांनाही मोठा धक्का बसला.
अनीस खानचा जीव घेणारे पोलीस नव्हते मग कोण होते? १९ फेब्रुवारीच्या रात्री घरात घुसणारे आरोपी कुणी पाठवले होते? त्यातील एकाने पोलिसाचा गणवेश कसा घातला होता? त्याच्याकडे गन कशी होती? का हे सगळं बनावट होतं? या सगळ्या प्रश्नांनी हे प्रकरण चर्चेत आलं आहे. अनीसच्या मृत्यूचं प्रकरण जितकं सोप्पं वाटतं तितकं सोप्पं नाही. कारण अनीस खानला न्याय मिळावा यासाठी राज्यभरात विरोध प्रदर्शन सुरु आहे.
कोण आहे अनीस खान?
मागील १३७ दिवसांपासून अनीस खान आलिया विश्वविद्यालयात विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरुन प्रशासनाविरोधात आंदोलन करत आहे. धरणं आंदोलन करतोय. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानावरुन अनीसनं विद्यापीठाविरोधात आवाज उचलला. जवळपास १३० कोटी अनुदान अद्यापही थकीत आहे. राज्य सरकारकडून यूनिवर्सिटीला आतापर्यंत केवळ १३ कोटी मिळाल्याचा आरोप आहे. त्यामुळे अनीसच्या मृत्यूचं गूढ वाढलं आहे. त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी होत आहे.