अंजलीच्या मैत्रिणीचे ड्रग्ज कनेक्शन?; निधी नावाच्या तरुणीला झाली हाेती अटक, तपासाला वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 08:33 AM2023-01-09T08:33:43+5:302023-01-09T08:33:57+5:30

जीआरपीने ६ डिसेंबर २०२० राेजी तेलंगणा एक्स्प्रेसमध्ये तपासणी दरम्यान ३ गांजा तस्करांना पकडले हाेते. त्यात निधीचा समावेश हाेता. 

Anjali Singh friend's drug connection?; A young woman named Nidhi was arrested | अंजलीच्या मैत्रिणीचे ड्रग्ज कनेक्शन?; निधी नावाच्या तरुणीला झाली हाेती अटक, तपासाला वेग

अंजलीच्या मैत्रिणीचे ड्रग्ज कनेक्शन?; निधी नावाच्या तरुणीला झाली हाेती अटक, तपासाला वेग

Next

नवी दिल्ली : अंजली सिंहची मैत्रीण निधी हिच्याबद्दल धक्कादायक माहिती उघड झाली आहे. आग्रा कँट रेल्वे स्थानकावर निधी नावाच्या तरुणीला ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली हाेती. तिच्याकडून १० किलाे गांजा जप्त करण्यात आला हाेता. ती १८ जानेवारी २०२१ पासून जामिनावर आहे. मात्र, ही आराेपी अंजलीची मैत्रीण निधी आहे का, याचा तपास करण्यात  येत आहे. जीआरपीने ६ डिसेंबर २०२० राेजी तेलंगणा एक्स्प्रेसमध्ये तपासणी दरम्यान ३ गांजा तस्करांना पकडले हाेते. त्यात निधीचा समावेश हाेता. 

६ महिन्यांपूर्वी अंजलीचा झाला होता अपघात

अंजलीचा १६ जुलै २०२२ राेजी पहाटे २ वाजता अपघात झाल्याची माहिती समाेर आली आहे. त्यावेळी ती गंभीर जखमी झाली हाेती. तिच्या श्वासातून मद्याचा गंध येत असल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे. या घटनेचे ही सीसीटीव्ही फुटेज शेअर केले आहे.

अंजली सिंहच्या परिवारास १० लाखांची भरपाई 

राजधानी दिल्लीतील कंझावला येथील दुर्घटनेत बळी पडलेली अंजली सिंह हिच्या परिवारास १० लाख रुपये भरपाई देण्याची घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. केजरीवाल यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले की, तिच्या मृत्यूची भरपाई तर केली जाऊ शकत नाही. तथापि, तिच्या परिवाराला मदत करण्यासाठी दिल्ली सरकारने आज १० लाख रुपये मंजूर केले आहेत.

सर्व ७ आरोपी अटकेत

दरम्यान, या प्रकरणातील सर्व ७ आरोपींना आता दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. ६ आरोपींना पोलिसांनी आधीच अटक केली होती. सातवा आरोपी शुक्रवारी रात्री पोलिसांना शरण आला.

Web Title: Anjali Singh friend's drug connection?; A young woman named Nidhi was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.