यूट्यूबवर सिनेमा बघून केला खतरनाक प्लान, पीएचडीच्या विद्यार्थ्याच्या शरीराचे केले 4 तुकडे आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 01:25 PM2022-12-15T13:25:02+5:302022-12-15T13:25:37+5:30
Crime News : आरोपीने पोलिसांना भरकटवण्यासाठी यूट्यूबवर सिनेमा पाहिला आणि तशीच पद्धत अवलंबली. पण आरोपी पोलिसांच्या नजरेतून जास्त काळ वाचू शकला नाही.
Crime News : दिल्ली श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर अशीच एक धक्कादायक घटना दिल्लीपासून जवळ असलेल्या गाजियाबादमधून समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने एका दुसऱ्या व्यक्तीची हत्या करून त्याचे चार तुकडे केले. त्यानंतर हे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. आरोपीने पोलिसांना भरकटवण्यासाठी यूट्यूबवर सिनेमा पाहिला आणि तशीच पद्धत अवलंबली. पण आरोपी पोलिसांच्या नजरेतून जास्त काळ वाचू शकला नाही. त्याने त्याचा गुन्हा कबूल केला.
गाजियाबादच्या मोदीनगरच्या राधा एनक्लेव भागातील ही घटना आहे. इथे भाड्याने राहणाऱ्या पीएचडीचा विद्यार्थी अंकित खोखर (35) ची हत्या घरमालकाने हत्या केली. नंतर त्याच्या मृतदेहाचे चार तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. आरोपी उमेश शर्माने अंकित खोकरची हत्या एक कोटी रूपयांच्या लालसेपोटी केली होती. त्याने आरीने मृतदेहाचे 4 तुकडे केले.
पोलिसांच्या चौकशीत आरोपी आपला गुन्हा कबूल करताना सांगितलं की, हत्या केल्यानंतर त्याने मृतदेहाचे चार तुकडे केले होते. ज्यातील दोन तुकडे त्याने गंगनहर आणि एक ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवेवर फेकला. पोलिसांनी बुधवारी उमेश आणि त्याचा मित्र प्रवेशला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर प्रकरणाचा खुलासा झाला. सांगण्यात आलं की, अंकित 6 ऑक्टोबरपासून बेपत्ता होता. त्याच्या मृतदेहाचे तुकडेही सापडलेले नाहीत.
चौकशी दरम्यान आरोपीने पोलिसांना सांगितलं की, त्याने अंकितची 6 ऑक्टोबरला हत्या करण्याचा प्लान केला होता. त्यामुळे तो त्याच दिवशी काही कारण सांगत त्याच्या घरी गेला आणि त्याच्याजवळ बसून त्याचं लग्न करण्याबाबत काही बोलू लागला होता. त्याने अंकितला हेही विचारलं की, लग्नाबाबत तू काय विचार केलाय आणि तुझ्यासाठी मुलगी शोधतो.
हे बोलत असताना आरोपी उमेश त्याच्या मागे जातो आणि त्याच्या आवळतो. थोडा वेळ जीव वाचवण्यासाठी धडपड केल्यावर अंकितचा जीव जातो. त्यानंतर आरोपी घरी जाऊन आरी घेऊन येतो. नंतर त्याने अंकितच्या मृतदेहाचे चार तुकडे केले. आरी आणतानाच तो बाजारातून पांढरी पॉलिथीन घेऊन आला होता.
आरोपीने गुन्हा कबूल करत सांगितलं की, त्याने हा प्लान यूट्यूबवर एक सिनेमा बघून केला होता. त्याने हे पाहिलं होतं की, जर हत्येनंतर कुणाचा मृतदेह सापडत नाही तेव्हा पोलीस आरोपीवर कोणतीही कारवाई करू शकत नाही. आरोपीने पोलिसांना सांगितलं की, अंकितची हत्या केल्यानंतर त्याने आधी त्याचं शीर कापलं. शरीरातील सगळं रक्त निघाल्यानंतर त्याने शरीराचे तीन तुकडे केले होते. हे तुकडे एका पॉलिथीनमध्ये भरले. नंतर रूम साफ केली. एका मित्राच्या गाडी हे पॉलिथीन ठेवले.
6 ऑक्टोबरला तो कार घेऊन गेला आणि शरीराचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. त्यानंतर तो घरी परत आला. पण आता पोलिसांसमोर मृतदेहाचे तुकडे जमा करण्याचं मोठं आव्हान आहे. पोलीस आरोपी उमेशला घेऊन ठिकठिकाणी फिरत आहे.