नागलगाव गोळीबार प्रकरणी दुसऱ्याही आरोपीला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 04:57 PM2021-08-02T16:57:29+5:302021-08-02T16:59:45+5:30

Firing Case : कर्नाटकातून घेतले ताब्यात : तीन दिवसाची कोठडी

Another accused arrested in Nagalgaon shooting case | नागलगाव गोळीबार प्रकरणी दुसऱ्याही आरोपीला अटक 

नागलगाव गोळीबार प्रकरणी दुसऱ्याही आरोपीला अटक 

googlenewsNext
ठळक मुद्देसोमवारी वरील दोन्ही अरोपीना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे .पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक घारगे हे करीत आहेत .

उदगीर (जि. लातूर) : नागलगाव (ता . उदगीर) येथील शेतात आरणी काढण्याच्या कारणावरून झालेल्या गोळीबार प्रकरणात दुसऱ्या आरोपीला सोमवारी कमालनगर (कर्नाटक ) येथून ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अटक केली असुन दोन्ही अरोपीना सोमवारी न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठवडी सुनावली आहे.

पोलिसांनी सांगितले, रविवारी नागलगाव (ता. उदगीर) येथे फिर्यादी सतीश गणपती गुडसुरे यांचे शेत सर्वे नंबर ४५७, ४५८ मधील सोयाबीनच्या पट्टीमध्ये शेतात काम करीत असताना आरणी काढण्याच्या कारणावरून अारोपी शिवाजी ग्‍यानोबा पाटील ( ७० ) व बाळासाहेब शिवाजी पाटील ( ५० ) यानी जीवे मारण्याची धमकी देऊन, संगणमत करून  शिवाजी ग्‍यानोबा पाटील याने त्याच्या स्वतःजवळ असलेल्या रिवाल्वरने जीवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या दिशेने गोळी झाडली, ती गोळी चुकल्याने त्याने दुसरी गोळी झाडली ती गोळी रमेश गणपती गुडसुरे याच्या पाठीमागे वरच्या बाजुला  लागल्याने गंभीर जखमी झाले होते . घटने नंतर दोन्ही अरोपी घटनास्थळा पासुन पळून गेले होते . दरम्यान जखमी रमेश गुडसुरे याला उदगीरच्या शासकीय रुग्णालयात प्राथमीक उपचार करून पुढील उपचारासाठी  त्याला लातूर येथे हलवण्यात आले आहे . यासंबंधी फिर्याद शिवाजी ग्‍यानोबा पाटील व बाळासाहेब शिवाजी पाटील यांच्याविरुद्ध रविवारी रात्री दहा वाजता  फिर्याद दिल्याने उदगीरच्या ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणात पोलिसांना माहिती मिळताच पोलीस अधीक्षक लातूर निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध घेणे कामी तथा पथक रवाना केले.  

यापैकी शिवाजी ग्‍यानोबा पाटील यास उदगीर येथील नाईक चौक येथून ताब्यात घेतले तर पळून गेलेला दुसरा आरोपी बाळासाहेब शिवाजी पाटील हा कमालनगर जिल्हा बिदर (कर्नाटक ) येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली वरून ग्रामीण पोलिसांच्या पथकाने त्यास ताब्यात घेतल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन यांनी दिली. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले रिव्हॉल्वर जप्त करण्यात आले आहे. सोमवारी वरील दोन्ही अरोपीना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे .पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक घारगे हे करीत आहेत .

Web Title: Another accused arrested in Nagalgaon shooting case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.