जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीच्या बनावट आदेशप्रकरणी आणखी एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 08:13 PM2021-05-05T20:13:39+5:302021-05-05T20:14:11+5:30

Fake collector's transfer order : अक्षयने अर्जुन सकपाळला मदत केली असल्याचा आरोप आहे. त्याने नेमकी कशी आणि काय मदत केली, त्यात त्यांचा हेतू काय होता, हे अजून उघड झालेले नाही.

Another arrested in fake collector's transfer order | जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीच्या बनावट आदेशप्रकरणी आणखी एकाला अटक

जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीच्या बनावट आदेशप्रकरणी आणखी एकाला अटक

googlenewsNext
ठळक मुद्देअर्जुन सकपाळ याला मदत करणाऱ्या दुसर्‍या आरोपीला अटक करण्यात आली आहे. अक्षय आनंदा बुडके (२८, रा. कोथळी, करवीर, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे.

रत्नागिरी : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या बदलीचा खोटा आदेश व्हायरल प्रकरणी रत्नागिरीपोलिसांनी अर्जुन सकपाळ याला मदत करणाऱ्या दुसर्‍या आरोपीला अटक करण्यात आली आहे. अक्षय आनंदा बुडके (२८, रा. कोथळी, करवीर, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे.

अक्षयला रत्नागिरी शहर पोलिसांनी बुधवारी पहाटे रत्नागिरीतच अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असते त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहीतकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप वांगणेकर करीत आहेत.

अक्षयने अर्जुन सकपाळला मदत केली असल्याचा आरोप आहे. त्याने नेमकी कशी आणि काय मदत केली, त्यात त्यांचा हेतू काय होता, हे अजून उघड झालेले नाही.

Web Title: Another arrested in fake collector's transfer order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.