बडतर्फ पोलिसांसह १२ जणांवर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 03:03 PM2020-07-24T15:03:01+5:302020-07-24T15:03:31+5:30

१७ लाखांची फसवणूक केल्याचा वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Another case of fraud has been registered against 12 persons including suspended police | बडतर्फ पोलिसांसह १२ जणांवर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल

बडतर्फ पोलिसांसह १२ जणांवर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देआत्तापर्यंत टोळीवर एकूण पाचवा गुन्हा दाखल

पुणे : बडतर्फ पोलीस शैलेश जगताप आणि परवेज जमादार व त्यांच्या साथीदारांवर १७ लाख रुपयांची फसवणुक केल्याचा आणखी एक गुन्हा वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार फेब्रुवारी २०१७ मध्ये घडल्याचे फिर्यादीत सांगण्यात आले आहे़. 
याप्रकरणी सोहन उत्तम आढाव (वय ३०, रा़ स्वामी विवेकानंदनगर, रामटेकडी, वानवडी) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.त्यानुसार प्रकाश फाले, त्यांची पत्नी सविता फाले, यश फाले, जयेश जगताप, शैलेश जगताप, परवेज जमादार, देवेंद्र जैन, रवींद्र बºहाटे, विनय मुंदडा, मुकेश पौडवाल, धिरज जाधव, विजय काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.
प्रकाश फाले यांनी औंधमध्ये ब्रेमेन चौक येथीलजीवप्रभा चॅरिटेबल ट्रस्टचा बंगला व शिवाजी हौसिंग सोसायटीमधील भुखंडाचे व्यवहार आपण करीत असून या व्यवहारात रक्कम गुंतविल्यास तुम्हाला दामदुप्पट रक्कम मिळेल, असे आमिष दाखवून रामटेकडी येथील घरी येऊन १७ लाख रुपये टप्प्याटप्याने घेऊन फसवणुक केली़ गुंतवणुक केलेली रक्कम परत मागितल्यावर शैलेश जगताप यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जयेश् जगताप व परवेज जमादार यांनी शिवीगाळ केली़ यावेळी तेथे इतरही जण उपस्थित होते. हे सर्व एकाच रॅकेटचे मेंबर आहेत आणि विविध घटनास्थळी सक्रीय सहभाग आहे, यावरुन त्यांनी सर्वांनी कट रचून आपला विश्वासघात करुन फसवणूक केलेली आहे.असे फिर्यादीत म्हटले आहे़ अशा प्रकाराचा सारखा मजकूर असलेली एक फिर्याद या आरोपींविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात दाखल आहे.
शैलेश जगताप, देवेंद्र जैन, रवींद्र बºहाटे यांच्यावर कोथरुड, समर्थ, खडक, हडपसर, डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. कोथरुड वगळता अन्य सर्व घटना या २०१२ पासून २०१८ च्या दरम्यान घडल्या असून त्याबाबत आता गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. यातील प्रमुख आरोपी रवींद्र बºहाटे हे अद्याप फरारी आहेत.

Web Title: Another case of fraud has been registered against 12 persons including suspended police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.