एजाज लकडावालाच्या दुसऱ्या हस्तकाला मुंबईतून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 09:41 PM2020-02-01T21:41:30+5:302020-02-01T21:44:08+5:30
कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याच्या आणखी एक साथीदाराला अटक केली होती.
मुंबई - कुख्यात गँगस्टर आणि अंडवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा माजी हस्तक एजाज लकडावाला याच्या दुसऱ्या हस्तकलाही मुंबईतूनअटक करण्यात आली आहे. फैयाज नाखुदाला असं या दुसऱ्या हस्तकाचे नाव आहे. हा हस्तक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याच्या आणखी एक साथीदाराला अटक केली होती. या साथीदाराचे नाव सलीम मेनन उर्फ महाराज असं आहे.
एजाज लकडावाला हा खंडणीसाठी फोन करायाचा आणि खंडणीचे पैसे आणण्याचं काम फैयाज नाखुदा करत असे. काही दिवसांआधी सलीम मेनन उर्फ महाराजला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. हा एजाजला मोठ्या व्यवसायिकांचे मोबाईल नंबर आणि पत्ते इतर माहिती पुरवायचा. खंडणी प्रकरणात महाराजचे नाव देखील सामील असल्याने खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी चौकशीसाठी त्याला डोंगरी येथील त्याच्या राहत्या घरी नेले होेते.महाराजच्या घराची ही पोलिसांनी झडती घेतली असून त्याला २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. महाराज विरोधात पोलिसांनी भा.दं.वि. कलम ३८४, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
एजाज लकडावाला याला मुंबई पोलिसांनी पाटणा विमानतळावरुन अटक केली. सध्या तो पोलीस कोठडी आहे. मुंबई पोलिसांच्या वॉण्टेड यादीत एजाज लकडावाला होता. ३७ गुन्ह्यांच्या प्रकरणात एजाज लकडावाला गुन्हेगार आहे. यामध्ये हत्या, खंडणी सारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. नुकत्याच एका प्रकरणात लकडावालासह महाराज ही सहभागी असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी (२८ जानेवारी) सकाळी अटक केली आहे.
गँगस्टर एजाज लकडावाला याला अटक, ८० हून अधिक तक्रारी, गुन्हे शाखेची कामगिरी
कुख्यात गुंड एजाज लकडावालाचा साथीदार महाराजला बेड्या
गँगस्टर एजाज लकडावाला अखेर मुंबई पोलिसांच्या जाळ्यात
२००३ मध्ये दाऊदच्या सहकाऱ्यांनी एका बॉम्बस्फोटात त्याला ठार मारण्याचा कट रचला होता. मात्र, तो या हल्ल्यातून बचावला होता. नंतर तो कॅनडामधून आपले खंडणी उकळण्याचे गुन्हे करत होता. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे एजाजविरुद्ध २७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी २५ गुन्हे मुंबईतील आहेत.